You are currently viewing मालवण व‌ कणकवली मध्ये ३ व ४ जुलै रोजी सत्यवान रेडकर सरांचे मार्गदर्शन

मालवण व‌ कणकवली मध्ये ३ व ४ जुलै रोजी सत्यवान रेडकर सरांचे मार्गदर्शन

*मालवण व‌ कणकवली मध्ये ३ व ४ जुलै रोजी सत्यवान रेडकर सरांचे मार्गदर्शन*

*४०० व्याख्याने पूर्ण*

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र, उच्चविद्याविभूषित, श्री‌. सत्यवान यशवंत रेडकर, वरिष्ठ अनुवाद अधिकारी, केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर मुंबई, भारत सरकार हे खालील वेळापत्रकाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शासकीय नोकरींच्या अनुषंगाने निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान देणार आहेत. शुक्रवार, दिनांक ३ जुलै २०२६, सकाळी ८.०० वाजता, भंडारी हायस्कूल, मालवण, सकाळी ११.०० वाजता, ए.एस.डी.टोपीवाला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मालवण, शनिवार, ३ जुलै २०२६, सकाळी ८.०० वाजता, कणकवली महाविद्यालय, सकाळी १०.३० वाजता, शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे, कणकवली. श्री. सत्यवान रेडकर सरांनी हल्लीच ४०० निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने पूर्ण केली आहेत. व्याख्यानासाठी एक रूपयाही मानधन घेत नाहीत. मालवण तालुक्यासाठी सेवास्पर्श फाउंडेशन तसेच कणकवली मध्ये भंडारी परिषद (नियोजित), स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट व कुंभवडे सहकारी मित्र मंडळ यांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा