पर्यावरणाला हानीकारक प्रकल्पांना विरोध; पालकमंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेचे मनसेकडून स्वागत
खासदार नारायण राणे यांच्या अणुऊर्जा प्रकल्पावरील वक्तव्याबाबत पालकमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे; मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यावरणाला, फळबागायतीला आणि पर्यटनाला हानी पोहोचवणारे कोणतेही प्रकल्प जिल्ह्यात होऊ देणार नसल्याची भूमिका पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. मात्र, प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या समर्थनार्थ खासदार नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
देवगड तालुक्यातील प्रत्येक ग्रामसभेने प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर केला असून, जिल्ह्यातील शेतकरी, पर्यावरणप्रेमी तसेच मुंबईस्थित सिंधुदुर्गवासीयांनीही या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर जनभावनेचा आदर राखत पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत पर्यावरणाला हानी पोहोचवणारा कोणताही प्रकल्प सिंधुदुर्गात होऊ दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. या भूमिकेचे मनसेने स्वागत करत त्यांचे आभार मानले आहेत.
मात्र, रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार नारायण राणे यांनी अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन करताना प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहिलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसल्याचेही मनसेने म्हटले आहे.
प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी खासदार नारायण राणे यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देऊन शासनाची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
_________________________
*संवाद मीडिया*
*रत्नागिरी जिल्ह्यात गेली 22 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा आणि 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या संस्थेचे*
*रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी* मध्ये *नर्सिंग* क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी
*रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी.*(Affiliated MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त)
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष *2026-2027*
🔸 *कोर्सचे नांव-
💠*(GNM)जनरल नर्सिंग मिडवाइफरी*
•Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years
💠*(ANM)ऑक्सिलरी नर्स मिडवाइफ*
•Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*👉OBC,SBC,NT च्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती. (शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.
*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
*पत्ता:*
ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ,करावांचीवाडी ,रत्नागिरी, 415612
*📞 संपर्क:*
*9960906947 / 9422620047*
कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204123/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
