*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ओघळती ते मोती…*
सरसरा,ओघळतो ते मोती
झाली वसुंधरा ओलेती…
भिजूनी चिंब दिसते किती मोहक
शालूचे भिजता टोक..
गाली चढली तिच्या हो लाली
मातीचे कुंकुम भाली
भांगात भरून ते मोती
कशी सजली पहा ओलेती
टपटपा थेंब ते गळती
जणू ओसांडून ती नवती
भरजरी शालू हिरवाकंच तो झोक
शालूचे भिजता टोक…
ते निळे वस्त्र हिरवाई
ते पाचू ठाई ठाई
फुलमाला अंगावरती
सौंदर्याला ये भरती
ते भृंग पहा गुणगुणती
पांखरे पहा किलबिलती
वसुधा न्हाता सारे कसे बिनधोक
शालूचे भिजता टोक…
ही वसुंधरा हो माता
जगताची आहे त्राता
ती सहस्त्रहस्ते देते
ते कधीही कमी ना पडते
दातृत्व तिचे हो थोर
विश्व ते असे बिनघोर
दुमदमते हो कीर्त तिची तिन्हीलोक
शालूचे भिजता टोक…
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
