You are currently viewing आंगणेवाडी जत्रा प्रथमच साध्या पद्धतीने

आंगणेवाडी जत्रा प्रथमच साध्या पद्धतीने

मसुरे:

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीचा वार्षिक यात्रा उत्सव 6 मार्च रोजी साजरा होत आहे कोरोना च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने व केवळ आंगणे कुटुंबीय व आंगणेवाडीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा यात्रोत्सव कोरोना चे शासनाचे निर्देश काटेकोरपणे पाळून होत आहे.  गर्दी टाळण्यासाठी यावर्षी पाहुणे मित्रमंडळी यात्रेकरू पंचक्रोशीतील ग्रामस्थांना विनंती की त्यांनी सहा व सात मार्च या दोन्ही दिवशी भराडी मातेचे उत्सवात सहभागी न होता जिथे आहे तेथूनच देवीला नमस्कार करावा व भराडी देवी चा वार्षिक उत्सव आणि सर्व निधी निर्विघ्नपणे पार पाडण्यास सहकार्य करावे असे आव्हान कुटुंबीयांतर्फे मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 4 =