You are currently viewing माझं गाव आरोग्य संपन्न गाव समितीवर रवी जाधव व विनायक गावस यांची निवड

माझं गाव आरोग्य संपन्न गाव समितीवर रवी जाधव व विनायक गावस यांची निवड

माझं गाव आरोग्य संपन्न गाव समितीवर रवी जाधव व विनायक गावस यांची निवड

आरोग्य जनजागृती आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकटीसाठी शासनाचा निर्णय

सावंतवाडी

शासनाच्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत तालुकास्तरीय कृती दल समितीवर सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते रवी जाधव आणि पत्रकार विनायक गावस यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये रवी जाधव यांची एनजीओ प्रतिनिधी तर विनायक गावस यांची पत्रकार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात सातत्याने सेवा देणारे रवी जाधव यांनी विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवून आपला ठसा उमटवला आहे. तसेच पत्रकार म्हणून कार्यरत असलेले विनायक गावस हे समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने प्रकाश टाकत जनजागृतीचे कार्य करीत आहेत.
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी, नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच गावपातळीवर आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, नियोजनासाठी आणि सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय कृती दल समिती कार्यरत राहणार आहे.
या निवडीबद्दल शासनाच्या अधिकारी व कर्मचारी प्रतिनिधींनी रवी जाधव आणि विनायक गावस यांचे अभिनंदन करत त्यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या निवडीमुळे आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा