*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रोजच असतो फादर्स डे*
🍃 ☘️
अंगणी माझ्या रोज येऊनी
घालतेस प्राजक्ताचा सडा
जागा होतो *उठून बघतो*
क्षणात भिजती नयन कडा
🍃🍀
आजही पाऊस आला थोडा
सांगून गेला तुझा निरोप
भेटून जाणार प्रत्यक्ष घरी
नाही सांगितलं प्रत्यक्ष स्वरूप
🌿☘️
येऊनी बसलो वेशी वरती
घेऊन आपली घोडा गाडी
वॉलेट राहील जरी घरी
घेतली तुजला जरीची साडी
☘️🍃
असून शेडूल तुझे बिझी
तरीही आलीस भेटायला
प्रकृती आपुली प्रथम जप
नको तिची हेळसांड व्हायला
☘️🍃
नको यायला सोडून कामे
वाटही आहे तशी बिकट
रोजच असतो *फादर्स डे*
रस्ता झालाय आज चिकट
☘️🍃
विनायक जोशी🖋️ ठाणे
मोबाईल/९३२४३२४१५७
🍃💦
