You are currently viewing 24 ते 26 डिसेंबर रोजी वायंगणी दत्त मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम

24 ते 26 डिसेंबर रोजी वायंगणी दत्त मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम

मालवण :

वांयगणी येथील संत दादा महाराज यांच्या दत्त मंदिराची भक्तगण सहकारी यांनी पुनर्बांधणी केलेल्या मंदिरामध्ये दिनांक 24 ते 26 डिसेंबर या तीन दिवसांमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये होमहवन, कलशारोहण, दत्तयाग, दत्त जयंती उत्सव या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने भजन स्पर्धा दिंडी कीर्तन या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे औचित्य साधून 2024 सालच्या दिनदर्शिकेचे संत दादा महाराज यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. या दिनदर्शिकासाठी ज्या भक्तगण सेवेकरी, हितचिंतकांना आपल्या शुभेच्छा जाहिराती द्यायच्या असतील त्यांनी त्या नाना करमळकर 8275780817, रामदास प्रभू 9370663902 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन नाना करमळकर व रामदास प्रभू यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा