You are currently viewing ‘प्रज्ञासूर्य’ काव्यसंग्रहाचे, मुखपृष्ठ प्रकाशित…!

‘प्रज्ञासूर्य’ काव्यसंग्रहाचे, मुखपृष्ठ प्रकाशित…!

मुंबई :

‘प्रज्ञासूर्य’ काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होत असून, आज रोहिणी प्रकाशन द्वारा नवी मुंबई येथे, काव्यसंग्रहाचे “मुखपृष्ठ” मोठ्या थाटात लाँच करण्यात आले.

‘वाचन छंद प्रेमी’ साहित्य, समूह प्रस्तुत, तथा रोहिणी प्रकाशन मुंबई द्वारा ‘प्रज्ञासूर्य’ काव्यसंग्रहात विविध महापुरुषांच्या जीवनचरित्रावर नामांकित साहित्यिकांनी आपल्या लेखनीने महापुरुषांच्या विचार तथा जीवन पट, सर्व सामान्य वाचकांच्या काळजाला भिडेल, अशा सरळ आणि साध्या शब्दांत कवितेत मांडले आहेत.

महाराष्ट्र भूमी महापुरुषांची भूमी म्हणून जगभर ओळखली जाते. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक महापुरुष जन्मास आले. त्यांचे तत्वज्ञानातून आपणास जीवन कसे जगावे, याची प्रेरणा मिळते.

अशा महापुरुषांचा वारसा महाराष्ट्र भूमीला लाभला आहे. याच महापुरुषांच्या विचाराचा वारसा समाजाला जगण्याचे बळ देत असतो, आणि हाच वारसा, ‘प्रज्ञासूर्य’ काव्यसंग्रहात प्रत्येक साहित्यिकांनी आपल्या कवितेत यथार्थ जपला आहे.

‘प्रज्ञासूर्य’ काव्यसंग्रह सदर पुस्तक तमाम वाचक-रसिक यांना नवीन दिशा दर्शक आणि महाराष्ट्राचा अभिमान ठरेल तथा पसंतीस उतरेल, यात शंका नाही…!

………………………

बबनराव वि. आराख

गांगलगाव

जि. बुलढाणा

फोन. 7875701806

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 18 =