You are currently viewing सुकृत

सुकृत

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

*सुकृत*
*******

मौनव्रती भाषा निःशब्दी
लोचनांनी उमजावी लागते
भावनांचे पावित्र्य सोज्वळ
ओंजळीत जपावे लागते

सुकृत हाच जन्म मानवी
इथे निर्मोही जगावे लागते
न लगे भय ते कलीकाळाचे
जगता जगता सहज उमगते

सत्कर्माची गंगा पुण्यपावनी
मोक्षाच्या सागराला मिळते
अर्थ जन्माचा दुजा कोणता
सांजवेळी रुप सावळे सजते
************************
*वि.ग.सातपुते. (भावकवी)*

प्रतिक्रिया व्यक्त करा