*जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य, श्रीशब्द लालित्य समूह प्रशासक तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी, लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*
(आनंदकंद वृत्त)
*घ्या उधार दुःखे*
जर वाटलीच घ्यावी तर घ्या उधार दुःखे
येथे न आवडीची, कोणास फार दुःखे
कर्मात भोग नक्की, ते चांगले करावे
छळतील काय मनुजा, मग ती असार दुःखे
आभाळ संकटांचे मी पेलले कितीदा
अन् सोसली सुखाने, क्षुल्लक टुकार दुःखे
वाट्यास येत गेल्या राशी अतिव सुखांच्या
हृदयात साठलेली, झाली फरार दुःखे
कष्टातल्या सुखाचा आनंद मान “दीपी”
पाहून हास्य ओठी, झालीत ठार दुःखे
✒️दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६
