You are currently viewing नॅब नेत्र रुग्णालयात आज अत्याधुनिक रेटिना विभागाचे उद्घाटन

नॅब नेत्र रुग्णालयात आज अत्याधुनिक रेटिना विभागाचे उद्घाटन

नॅब नेत्र रुग्णालयात आज अत्याधुनिक रेटिना विभागाचे उद्घाटन

सकाळी ११.३० वाजता होणार सोहळा; नेत्रपटल आजारांच्या निदान व उपचारांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार

सावंतवाडी :

नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी, सावंतवाडी येथे अत्याधुनिक रेटिना (नेत्रपटल) विभागाचे उद्घाटन आज, शुक्रवार दि. 19 जून 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या नवीन विभागामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना नेत्रपटलाशी संबंधित विविध आजारांचे अचूक निदान व आधुनिक उपचार सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहेत.
जिल्हा रुग्णालय ओरोस-सिंधुदुर्गचे सिव्हिल सर्जन मा. डॉ. श्रीपाद पाटील यांच्या हस्ते या विभागाचे उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी विविध मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार आहेत.
नवीन रेटिना विभागामध्ये फेको मोतिबिंदू शस्त्रक्रिया, नेत्रपटल (रेटिना) तपासणी, रेटिना स्कॅनिंग व सोनोग्राफी, रेटिना लेसर उपचार, रेटिना शस्त्रक्रिया तसेच डायबेटिक रेटिनोपॅथीचे निदान व उपचार यांसारख्या अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होऊन स्थानिक स्तरावरच दर्जेदार नेत्रोपचार मिळू शकणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहून नव्या सुविधेची माहिती घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नॅबचे अध्यक्ष श्री. अनंत उचगावकर, सचिव श्री. सोमनाथ जिगजिनी, श्री. राहुल देशपांडे आणि श्री. मनीष पटवर्धन यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा