खासगी बस आणि टेम्पोत भीषण अपघात

खासगी बस आणि टेम्पोत भीषण अपघात

टेम्पो चालकाचा मृत्यू ; बांद्याहून म्हापसाच्या दिशेने जात होती बस

बांदा

बांद्याहून म्हापसाच्या दिशेने जाणार्‍या खासगी बसला विरुद्ध दिशेने येणार्‍या टेम्पोने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील ८ महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. जखमींवर म्हापसा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात कोलवाळ बिनानी स्टॉपसमोर आज सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास झाला. म्हापसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा येथून म्हापसा- पेडणे -पत्रादेवी (बांदा) ही खासगी बस (जीए ११ टी ०५५४) प्रवाशांना घेऊन म्हापशाच्या दिशेने जात होती. वन वे असतानाही समोरुन येणार्‍या टेम्पोने (जीए ०१ टी ५५९८) बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की चालकाचा अपघातात मृत्यू झाला. बसमधील ८ प्रवासी जखमी झाले. त्यांना म्हापसा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. टेम्पो चालक दारुच्या नशेत असल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे. वन वे असतानाही हायवे कंत्राटदार एमव्हीआर कंपनीने तसे दिशादर्शक फलक न लावल्याने हा अपघात झाल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा