You are currently viewing महाविद्यालयीन ग्रंथालयासाठी सद्गुरु राऊळ महाराज संस्थानची मोलाची देणगी

महाविद्यालयीन ग्रंथालयासाठी सद्गुरु राऊळ महाराज संस्थानची मोलाची देणगी

*महाविद्यालयीन ग्रंथालयासाठी सद्गुरु राऊळ महाराज संस्थानची मोलाची देणगी*

📍 साळगाव | १८ जून

शिक्षण प्रसारक मंडळ झराप्पा पंचक्रोशी साळगाव संचलित, मुंबई विद्यापीठ संलग्न परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगाव हे महाविद्यालय १७ वर्ष यशस्वी पूर्ण करून १८ व्या वर्षात पदार्पण करत असताना भौतिक सुविधांच्या वृद्धीसाठी एक महत्त्वपूर्ण योगदान प्राप्त झाले आहे.

सद्गुरु राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी यांच्या वतीने महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी चार कपाटे देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आली. या कपाटांच्या चाव्या संस्थेचे कार्याध्यक्ष विठोबा विनायक राऊळ व उपकार्याध्यक्ष दशरथ विनायक राऊळ यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी संस्थेचे श्री अशोक शँकर तेजम- कोषाद्यक्ष श्री. गिरीधर आप्पा राऊळ- विश्वस्त श्री. शिवराम विनायक राऊळ- विश्वस्त श्री. गुरुनाथ रामचंद्र धुरी- विश्वस्त श्री. विनायक सदाशिव प्रभू- पुरोहित इत्यादी पदाधिकारीही उपस्थित होते.

या उदार देणगीबद्दल प्राचार्यांनी संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करताना, “महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मिळालेली ही मदत अत्यंत मोलाची असून, संस्था व महाविद्यालयाच्या वतीने आम्ही आपले ऋणी आहोत,” असे गौरवोद्गार काढले.

यावेळी कार्याध्यक्ष विठोबा राऊळ यांनीही “शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी आणि महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी संस्थेच्या माध्यमातून भविष्यातही शक्य ती सर्व मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” अशी ग्वाही दिली.

🙏 *सद्गुरु राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी यांच्या या सामाजिक व शैक्षणिक बांधिलकीच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.*

प्रतिक्रिया व्यक्त करा