You are currently viewing काव्यवाचन स्पर्धेत मालवणचे नितीन वाळके प्रथम…

काव्यवाचन स्पर्धेत मालवणचे नितीन वाळके प्रथम…

काव्यवाचन स्पर्धेत मालवणचे नितीन वाळके प्रथम…

वेंगुर्ला

नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे २१ एप्रिल रोजी घेतलेल्या कै.सौ.कुमुदिनी गुरूनाथ सौदागर स्मृती काव्यवाचन स्पर्धेत प्रथम-नितीन वाळके (मालवण) – ‘नागोबाच्या तयारेक मी‘, द्वितीय-मृण्मयी बांदेकर-पोकळे (सावंतवाडी)-‘टेक्नॉलॉजीचे आयुष्य‘, तृतीय-रसिका तेंडोलकर (कसाल) – ‘फका‘ व जिद्दी जाधव (वेंगुर्ला) – ‘मी पाहिला सागर‘ यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परिक्षण वीरधवल परब, अनिल सौदागर, कैवल्य पवार, माया परब यांनी केले.

अनिल श्रीकृष्ण सौदागर यांनी आपली काकी कै.सौ.कुमुदिनी गुरूनाथ सौदागर यांच्या स्मरणार्थ ही काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यासाठी दोन लाख रूपये एवढा कायम निधी संस्थेकडे दिला आहे. सिधुदुर्ग जिल्ह्यातील कवींना आवाहन करून स्पर्धेसाठी संस्थेने कविता मागविल्या होत्या. त्यातील निवडक २५ कवींना कविता सादरीकरणासाठी बोलविण्यात आले होते. दरम्यान, स्पर्धेसाठी आलेल्या एकूण कवितांपैकी निवडक ३० कवितांचे पुस्तक काढण्यात आले. याचे प्रकाशन सिधुदुर्ग प्रशासकीय अधिकारी संजय घोगळे यांच्या हस्ते झाले. नगर वाचनालय हे माझे प्रेरणास्थान आहे. माझ्या शैक्षणिक काळात मी वाचनालयातील पुस्तकांचे वाचन केले आणि त्यातूनच मला लेखनाची आवड निर्माण झाी. वाचनालयाचा मी ऋणी आहे. वाचनालयाचे उपकार मी विसरू शकत नाही असे उद्गार पुस्तक प्रकाशानावेळी श्री. घोगळे यांनी काढले.
संस्थेच्या लक्ष्मीबाई प्रभाकरपंत कोरगांवकर सभागृहात संपन्न झालेल्या या स्पर्धेवेळी संस्था अध्यक्ष अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, सदस्य महेश बोवलेकर, श्रीनिवास सौदागर, मयुरेश सौदागर, अजित राऊळ, पी.के.कुबल, दिलीप सावंत, प्रितम ओगले यांच्यासह जिल्ह्यातील कवी, वाचक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा