*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”राजमाता माँ जिजाऊंना पुण्यतिथी निमित्त अभिवादन!”*
जिजाऊ माँ जगदंबा राष्ट्राची जननी
धन्य जाहली शिवबास जन्म देऊनी।।धृ।।
पती राजे होते निजामाचे वीरमणी
भूमिका निभावे आदर्श माता पत्नी
डगमगली ना कधी झुंजार रागिणी।।1।।
पुत्राचे पाय पाळण्यात राहे ओळखुनी
शिवबाला समजावी स्वधर्म कहाणी
बाळगोपाळांना सांगे गोष्टी मर्दानी।।2।।
स्वराज्य स्थापावे ध्यास तिचे मनी स्वप्नि
सुराज्य व्हावे शिवबास शिकवणी
जय जय कार करी म्हणे माय भवानी।।3।।
शिवबा शूर मावळा राहे दुष्टां संहारूनी
प्रजेला सांभाळी सर्व धर्म भावनेनी
जाणता राजा किर्ती राही संपादूनी।।4।।
©️काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
