You are currently viewing फोंडयाच्या दात पडक्या आप्पाचे गैरधंदे जोरात..

फोंडयाच्या दात पडक्या आप्पाचे गैरधंदे जोरात..

सोबतीक राजकारण्यांची वरात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गैरधंदे करणाराच पाहिजे, गैरधंदेवाल्या लोकांना रान मोकळे आहे, एकतर हफ्ते देऊन गैरधंदे करायचे किंवा चोरीछुपे. दोन्ही मार्ग अगदी सहज उपलब्ध आहेत. जिल्ह्यावर वचक कोणाचाही असो तिथे फक्त पैसा बोलतो आणि पैसा बोलतो तिथे सर्वच यंत्रणा आंधळी पांगळी लुळी बनते. असाच प्रकार सुरू आहे तो फोंडयाच्या दात पडक्या आप्पाच्या बाबतीत.
गोव्यातील करमुक्त दारू महाराष्ट्र सरकारचा महसूल बुडवून राज्यात आणि राज्याबाहेरही दूरवर अगदी बिनधास्तपणे पुरविण्याचा मोठा व्यवसाय हा आप्पा करत आहे. गोवा राज्याच्या सीमेवरून दारू महाराष्ट्रात येते आणि पुढे दूरपर्यंत ती वितरित होते म्हणजे संबंधित यंत्रणा यामध्ये सामील असल्याशिवाय हे होतंच नाही. मोठमोठे हफ्ते घेऊन संबंधित यंत्रणा बेमालूमपणे या अवैद्य दारूच्या गाड्या जिल्ह्यात आणि जिल्ह्या बाहेर जाण्यास मदत करतात आणि स्वतः मात्र नामानिराळे राहतात. त्यामुळे खाकी वर्दी देखील आप्पाच्या धंद्यांत पूर्णपणे बरबटली असल्याचे दिसून येते.
आप्पाच्या हा एकच गैरधंदा नसून जुगाराच्या मोठमोठ्या बैठका जिल्ह्यात आणि शेजारील राज्यात देखील घेण्याचा त्याचा सर्वात मोठा धंदा आहे. कणकवली शहरात तर आप्पाच्या रोजच बैठका असतात, दरदिवशी जागा बदलून कणकवली मध्ये जुगाराचे अड्डे चालतात. पारावर बसणारी काही मोठमोठी राजकीय मंडळी देखील या बैठकांमध्ये सामील असतात. त्यामुळे आपलेच दात आपलेच ओठ म्हणत त्यांच्यावर कारवाई देखील होत नाही. राजकीय मंडळींचा वावर असल्याने आप्पाच्या बैठका निर्धास्तपणे हफ्ते देऊन सुरू असतात.
सुकळवाड येथील एका मठाच्या बाजूलाच आप्पाच्या मोठ्या बैठका रोज रात्री साडे अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत चालतात. या बैठकीमध्ये दात पडक्या आप्पाची अर्धी पार्टनरशिप आहे. त्यामुळे आप्पा म्हणजे जुगाराचा आणि गैरधंद्यांचा बादशाह बनला आहे.
गोव्यात देखील काही ठिकाणी दात पडक्या आप्पाची जुगाराच्या बैठकांमध्ये पार्टनरशिप आहे. गोव्यात देखील त्याचे गैरधंदे जोरात सुरू आहेत. केरी येथील आजोबाच्या जत्रोत्सवात तर आप्पाच्या जुगाराच्या बैठकीने कमालच केली. एका रात्रीत जत्रेतील जुगारामध्ये आप्पाने तब्बल दहा लाख रुपये मिळवले. एखाद्या उद्योगपतीची कमाई देखील आप्पाच्या गैरधंद्यांचा कमाईपुढे तुटपुंजी वाटेल इतकी कमाई आप्पा जुगाराच्या बैठकीतून करतो. त्यामुळेच त्याला खाकी वर्दीची सुद्धा भक्कम साथ लाभते.
जुगाराच्या, दारूच्या गैरधंद्यातून मिळणाऱ्या अमाप मायेमुळे आप्पासारखे गैरधंदेवाले बोकाळले आहेत आणि जुगाराच्या नादापायी अनेक गोरगरीब लोकांचे संसार मात्र उघड्यावर पडले आहेत. खाकी वर्दीतील मुजोर हफ्तेखोर अधिकारी मात्र आपली खळगी भरण्यासाठी गैर धंद्यांना पाठीशी घालतात, त्यामुळे गैरधंदे जिल्ह्यात फोफावत चालले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + nineteen =