You are currently viewing स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते…
स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते त्यांची 20 कि. वजनाची तलवार..

स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते…

स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते… आजही जतन करून ठेवलेली त्यांची 20 कि. वजनाची तलवार…

♦स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते. मूळ गाव तळबीड, जिल्हा सातारा. त्यांचं मूळ नाव हंसाजी संभाजी मोहिते, परंतु त्यांच्या कर्तबगारीवर खुश होऊन छ. शिवाजी महाराजांनी त्यांना हंबीरराव हा किताब बहाल केला तेव्हापासून ते याच नावाने ओळखले जाऊ लागले.

♦छ. शिवाजी महाराजांची पत्नी राणी सोयराबाई यांचे ते बंधू. हंबीररावांनी छ. शिवाजी महाराजांना भक्कम साथ दिली अनेक लढाया आपल्या हिमतीवर जिंकल्या, आपल्या शौर्याने मोघलांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्याच बरोबर आदिलशाहीलाही दणका दिला होता.

♦प्रतापगडावरील अफझलखानाबरोबरच्या लढाईत त्यांनी एकट्याने 600 शत्रू मारले होते, म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांच्या तलवारीवर 6 चांदणींच्या आकाराचे शिक्के लावले होते. शिवाजी महाराज एका योध्याने एका युद्धात 100 शत्रू मारले तर एक शिक्का तलवारीवर लावत असत असं म्हणतात.

♦छ. शिवाजी महाराजानंतर संभाजी राजेंना गादीवर बसविण्यात हंबीरारावांचा मोठा हात होता, आणि संभाजी राजेंच्या काळातही हंबीररावांनी शौर्य गाजवलेलं आहे.
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार 20 किलो वजनाची होती. आजही त्यांची तलवार तळबीड, जिल्हा सातारा येथे त्यांच्या वंशजानी जतन करून ठेवलेली आहे. आजही ती तलवार जशीच्या तशी आहे.

♦औरंगजेबचा सरदार सर्जाखान ला पराभूत करून विजयी होऊन माघारी येत असताना किल्ल्यावरून डागलेला तोफेचा गोळा छातीवर लागून त्यांना वीरगती प्राप्त झाली होती. शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या या वीर योध्याची तलवार आजही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहे.

♦अशा या महान पराक्रमी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा…!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 6 =