आम्ही संजू परबांचा जाहीर सत्कार करू…दर्शना बाबर

आम्ही संजू परबांचा जाहीर सत्कार करू…दर्शना बाबर

महिला जिल्हाध्यक्षा – राष्ट्रवादी उद्योग-व्यापार

सावंतवाडी प्रातिनिधी :
शहरात सुरू असलेल्या अवैद्य धंद्यांच्या विरोधात नगराध्यक्ष संजू परब यांनी उघडलेली मोहीम स्वागतार्ह आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर शहरातील सर्व अवैद्य धंदे पूर्णता बंद झाल्यास आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू, असा टोला राष्ट्रवादीच्या उद्योग-व्यापार महिला जिल्हाध्यक्षा दर्शना बाबर-देसाई यांनी लगावला आहे.
नगराध्यक्ष परब यांनी सावंतवाडी शहरातील अवैद्य धंदयाच्या विरोधात मोहीम उघडली आहे. हे धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी केली आहे. या सर्व प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. असे त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, त्यात परब यांच्या इशाऱ्यानंतर सावंतवाडी अवैद्य धंदे पूर्णतः बंद झाल्यास आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू असे त्यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा