You are currently viewing ओल्या ओल्या सांजवेळी

ओल्या ओल्या सांजवेळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ओल्या ओल्या सांजवेळी*

 

ओल्या ओल्या सांजवेळी

गाळून पिते कडू आठवणी

मैत्रीदिनाची यम्मी कविता

आठवून येते डोळा पाणी

१

वाट पाहत बसते एकटी

घेत चहाचे घुटके *गरम*

आठवण येते गतक्षणांची

क्वचित वाटे तेव्हा शरम

२

उगा तोडले नाते *सुंदर*

आणि गमावली मुले दोन

जुळेल का हे तुटले नाते

अजूनही सांधेल चौकोन

३

आशा वेडी अजून बघते

येईल कां तो मागे वळून

धरीन त्याचे पाय उराशी

वहातील धारा अश्रू वरून

४

एक हाताने नाही वाजत

टाळी दुनियेत कुठे कधी

शब्दबाण ते वर्मी लागती

अधीक कामाचे ताणामधी

५

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मोबाईल/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा