You are currently viewing भूमिका

भूमिका

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी जयराम धोंगडे यांची अप्रतिम काव्यरचना

आठवणही न यावी,
एवढा विसर काय कामी?
पुन्हा पुन्हा भेटत राहू…
मित्रा, याची काय हमी?

जगण्याच्या या लाटेमध्ये,
स्वतःसाठी जगतो जो तो!
पुढे पुढे ते कुठे जायचे..?
स्मशान थांबा, एक लागतो!

येणे जाणे सुरूच आहे,
गेला त्याला किती स्मरती?
स्मरणामध्ये तोच राहतो…
कर्मच ज्याची त्याची किर्ती!

उदात्त जे जे आणि चांगले,
तेच करावे त्यात भले!
ध्यानामध्ये एकच ठेवा…
कितीक आले आणि गेले!

जीवन म्हणजे नाटक आहे,
नीट भूमिका साकारावी!
पडद्यावर अन् पडद्यामागे…
अमीट छाप सदा पाडावी!

जयराम धोंगडे, नांदेड

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =