You are currently viewing सुदृढ शरीर
Oplus_16908288

सुदृढ शरीर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम अभंग रचना*

 

*सुदृढ शरीर*

 

श्वास नि निश्वास|आहे प्राणाधार|

सुदृढ शरीर |मानवास||१||

 

उठा प्रात:काली करा नित्यकर्म

अभंगाचे मर्म |गाता कळे ||२||

 

घालून आसन योग प्राणायाम

श्वासांचे नियम |ध्यानी धरा||३||

 

चहूबाजूंचे ते | विचार रोखणे|

चित्त गुंतवणे |श्वासाकडे||४||

 

व्यायाम आहार | करा संतुलीत

आजारास मात| देण्यासाठी||५||

 

निसर्ग प्रसन्न | पायी फिरण्याने|

दृष्टीने बघणे |अलौकीक||६||

 

चित्त वृत्ती ठेवा |सदा समाधानी|

आनंद जीवनी| निश्चितच ||७||

 

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा