You are currently viewing कवितेचे रंग विलास के संग
Oplus_16908288

कवितेचे रंग विलास के संग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमरानी लिखित अप्रतिम लेख*

 

*कवितेचे रंग विलास के संग* 

*शांतीब्रह्म प्राप्त झालेला, मनाचा समतोल साधलेला, तटस्थ वृत्तीचा एखादा संतसज्जन जशी वृत्ती तसे विचार या नात्याने तशा प्रकाराचे दिव्य आणि लौकिक विचार करू लागतो आणि दिव्य लहरीतून विश्वात शांती, सुसंगती,आणि एकात्मता घडविणारे विचार पसरवतो, हे विचार सर्व दिशात विजेच्या वेगाने विचार लहरी माणसांच्या मनातही प्रवेशतात, आणि मग त्या माणसांच्या मनातही त्यासारखेच शांतीचे आणि सुसंवादाचे विचार स्फुरण पावतात, असाच अनुभव विलास कुलकर्णी (अप्पा) यांच्याशी गप्पा मारताना येतोच येतो. कवितेतील प्रतिमांना मजबूत आणि टिकाऊ करण्याची खास लकब अप्पाकडे आहे. खोलवर चिंतनाची, स्पष्ट व गहन विचार करण्याच्या वृत्तीचे ते निकष सहज पार करतात. आपल्यातील प्रतिभाच्या बकुळ फुलांचा वर्षाव ते इतरावर हसत हसत करतात. माझा व त्याचा परीचय झाल्यापासून गेल्या दहा वर्षापासून मी अनुभवतोय.

मानवी जीवनाची भावशुध्दी होणे आणि भक्तीरसातून अर्थातच अष्टसात्विक भावातून आपले जीवनकमळ फुलणे ही मानवी जीवनाची कृतार्थता हिच मानवी जिव्हाळ्याची समरसता टिकवण्यातच अप्पा धन्य मानतात. सध्याच्या भयाण कलीयुगात मानवी जीवनातील जिव्हाळा टिकवण्यासाठी विलास कुलकर्णीची धडपड कौतुकास्पद आहे. गुरुची ज्ञानकिरणे आणि जिव्हाळ्याची चंद्रकिरणे चातकासारखे आपण झेलली तरच आपली महानरकातून सुटका होइल. अशी धारणा समाजमनात रूढ करण्याचा प्रयत्न अप्पा सतत करत आहेत.

अप्पाच्या लहानपणी डोकावून पाहिलं कि, उकल सहज होतेच. प्रत्येकात काहीतरी वेगळेपण असतेच. संगमनेर येथील ज्ञानमाता विद्यालयातील श्री. चं. का. देशमुख सरांनी विलास कुलकर्णीचे अनेक निबंध वर्गात वाचून दाखवले. त्याच्यातील प्रतिभेला त्यानीच बाळकडू पाजले.प्रोत्साहन दिले. मग एक दिवस मित्राचे गुणगान करणारी दोन पानी कविता लिहिली.देशमुख सरांनी वाचली. व्वा रे व्वा पठ्ठ्या म्हणून शाब्बासकी देऊन प्रोत्साहित केले.अन् विचारलं, “पुढे काय करणार?” या प्रश्नाचे उत्तर त्या लहान वयात सुचले नाही. पण कवितेची बीजे सुप्त मनाच्या पटलावर रुजली गेली.

दहावी परीक्षा झाल्यावर विद्युत अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. मधल्या काळात वाचन पुर्णपणे बंद झाले. मात्र नोकरी निमित्त दादर येथे असताना मुबंई मराठी ग्रंथालयाचा सभासद

झाल्यानंतर मात्र मनसोक्त वाचन करायला मिळाले. पुढे साखरपुडा झाला. साखरपुडा व लग्न या मधल्या काळात कविता सुचत गेल्या. लग्न झाल्यावर संसारीक जबाबदारी वाढली. चौदा – पंधरा वर्षाच्या दीर्घ खंडानंतर काही कविता सूचत गेल्या.सुप्त मनाच्या गाभा-यातून कवितेचा पाझर फुटत गेला.

एक दिवशी मेहुण्याची मुलगी क्षितिजाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक कविता लिहिली. तीच कविता पहिली वाढदिवसाची कविता ठरली. कविता सर्वाना खूप आवडली. मग काय वाढदिवसाच्या कविता करण्याचा सपाटा सूरु झाला.

मग काय हो, वाढदिवसाची कविता करावी म्हणून नातेवाईक, मित्र, सगेसोयरे, अनोळखी व्यक्ती आपल्या वाढदिवसाच्या चार पाच दिवस अगोदरच कळवयला लागले.कि,”आपल्या वाढदिवसा निमित्त कविता करावी. ” विलासराव त्याचा मान राखून कवितातून त्याचे गुणगान करु लागले. तेही खूष होऊन चांगलाच प्रतिसाद द्यायचे.अशा कविता मधून मिळणारा आनंदाचे मोजदात करताच येईना. एक दिवस नाशिक येथे विलासचे घनिष्ठ मित्र विलास पंचभाई आणि श्री पांडूरंग कुलकर्णी याची भेट झाली. त्यांना भेटून आमचे अप्पा मुंबईकर न राहता नाशिककर झाले.

त्या भेटीत विलास पंचभाईनी सल्ला दिला कि, वाढदिवसाच्या कविता बरोबर इतर विषयावर कविता लेखन करावे. हा सल्ला अप्पासाठी गुरुदक्षिणाच होता.

एक दिवस संत तुकारामाचा ‘ ‘ भेटी लागे जीवा ‘ हा अभंग ऐकत असतांना ‘ भेट ‘ या विषयावर कविता लिहिण्याचा मोह झाला. आणि मग ‘भेट’ या विषयावर कविता लिहायला सुरवात झाली. आणि अप्पाच्या जुलै 2025 आणि पत्नीच्या चव्वेचाळीस वर्ष वयाच्या एवढ्या कविता,” भेट “या विषयावर कवितासंग्रह काढून सारस्वताच्या हाती देतानाचा आनंद वेगळाच होता.

” विलास जे काही करशील ते मन लावून व वेगळे कर”असा विचार रुजवणारी विलासची आद्य गुरु म्हणजे त्याची मातोश्री, कविताची आवड निर्माण करणारे मराठीचे शिक्षक श्री. चं .का. देशमुख व शिक्षिका पत्नी सौ. सुचिता कुलकर्णी ह्या गुरूंना विलास कुलकर्णी यानी पहिले पुस्तक पुष्प अर्पण करुन आपल्या मनातील आदरपूर्वक भावना व्यक्त केली.

याच बरोबर जगभर गाजत असणाऱ्या “साकव्य समूह जनसंपर्क अधिकारी ”

समाजिक सेवा, सर्व मनातील सांगण्याची वृत्ती, शिकण्याची आवड, आणि विशेष म्हणजे संत अप्पा महाराज म्हणून प्रसिध्द, भेट या विषयावर 84 कविता, भेट या नावाचे ई बुक, शृंगारिका नावाचे ई बुक, लावणी विषयावर पुस्तक प्रकाशन या सर्व विशेष बाबींचा उल्लेख केल्याशिवाय त्याचा परिचय पुर्ण होत नाही.

अशा प्रकारे साहित्य क्षेत्रातील विलास कुलकर्णी यांचे स्थान अत्यंत महत्वाचे व गौरवपुर्ण आहे*

लेखन

*मुबारक उमराणी, सांगली*

*मो. 9766081097*

प्रतिक्रिया व्यक्त करा