दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेनेतर्फे सत्कार
रविवार, ७ जून रोजी दोडामार्ग येथील महालक्ष्मी हॉलमध्ये कार्यक्रम
दोडामार्ग :
तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार शिवसेना दोडामार्गच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. हा सत्कार समारंभ रविवार, ७ जून रोजी सकाळी ११ वाजता महालक्ष्मी हॉल, दोडामार्ग येथे होणार आहे.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे बेसिक, महिला व युवा पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, शिक्षक, पालक तसेच शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
उपस्थित राहण्याचे आवाहन
या सत्कार समारंभास विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना दोडामार्गच्या वतीने करण्यात आले आहे.
