You are currently viewing कुडाळ न.पं. मधील शिवसेनेच्या विजयी उमेदवारांचे आ.वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

कुडाळ न.पं. मधील शिवसेनेच्या विजयी उमेदवारांचे आ.वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

शिवसैनिकांकडून जल्लोष साजरा

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे 7 नगरसेवक निवडून आले असून कुडाळ शिवसेना शाखा येथे या सर्वांना आमदार वैभव नाईक यांनी पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केलेे. यावेळी शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, आमदार वैभव नाईक आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.
शिवसेनेच्या उमेदवारांमधून प्रभाग 1 मध्ये ज्योती जळवी, प्रभाग 4 मध्ये श्रुती वर्दम, प्रभाग 9 मध्ये श्रेया गवंडे, प्रभाग 13 मध्ये सई कळप, प्रभाग 14 मध्ये मंदार शिरसाट, प्रभाग 15 मध्ये उदय मांजरेकर, प्रभाग 16 मध्ये किरण शिंदे यांनी विजय मिळवला आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव,शहरप्रमुख संतोष शिरसाट,विकास कुडाळकर,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, अतुल बंगे, मिलिंद नाईक, भूषण परुळेकर, गणेश कुडाळकर,कृष्णा धुरी,संजय भोगटे,सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर,राजू कविटकर,रामा धुरी,स्नेहा दळवी, श्रेया गवंडे, श्रेया परब, मथुरा राऊळ, रुपेश पावसकर, सुशील चिंदरकर,नितीन सावंत, दीपक आंगणे, योगेश धुरी,रिमेश चव्हाण, स्वप्नील शिंदे, चेतन पडते,कुष्णा तेली, बाळा राऊळ, जीवन बांदेकर, गुरु सडवेलकर, गुरु गडकर,भूषण कुडाळकर, मितेश वालावलकर, सत्यवान कांबळी, चिन्मय पोईपकर, सतीश कुडाळकर आदींसह आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 − 1 =