You are currently viewing फूल गुलाबाचं

फूल गुलाबाचं

कसं जमतं तुला रोज,
हसत हसत जगायला.
हसता हसता एकदा,
विरघळून जायला.

आशा नसते तुला,
दिवसेंदिवस जगण्याची.
आनंद वाटून जगाला,
सुख पाहत बसण्याची.

नाजूक फांदीवर तू,
कळी बनून येतेस.
भार पेलण्याची तिला,
सवय करून देतेस.

हिरवागार रंग तुझा,
आतुन असेल कसा.
उमलत नाहीस तोवर,
म्हणे वाट पाहत बसा.

सोनेरी किरणांसोबत,
सकाळी तू उमलतेस.
भुंग्या किटकांना तू,
हसतच रसपान करतेस.

कळीचं फुल होताना,
वेगवेगळ्या छटा दिसतात.
कधी फांदीवर बागडतेस,
कधी केसांच्या बटा सजतात.

जेव्हा त्या पाकळ्या गळतात.
सौंदर्य तुझी साथ सोडतं.
कितीही आनंद वाटलास तरी,
दुःख सर्वांच्या पदरात पडतं.
दुःख सर्वांच्या…..

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 13 =