You are currently viewing माझे बाबा….

माझे बाबा….

अष्टाक्षरी काव्यप्रकार

देवतुल्य बाबा माझे

देवतुल्य बाबा माझे
माझ्या जीवनाची स्फूर्ती
सदा माझ्या जीवनात
देवरूप असे मूर्ती

वेध घेई भविष्याचा
सर्वावर सम माया
लेकरांच्या सुखासाठी
झिजवितो तया काया

दुःखे जरी आली किती
कुटुंबाची बने ढाल
विसरून सर्व काही
माझ्या ममतेची शाल

दीपस्तंभ जसा उभा
दावी  प्रकाश आशेचा
मार्ग देई चुकल्यांना
योग्य आयुष्य दिशेचा

तन अपुले अर्पूनी
दिला जीवनी आकार
आशीर्वाद दिला सदा
स्वप्न होईल साकार

ऋण नाही फेडी कधी
किती सोसलास भार
दिली संस्कार शिदोरी
माझ्या जीवनाचे सार

कवी :(स्नेहदीप)
श्री. संदीप  सुरेश  सावंत
तळे खोल, दोडामार्ग
जि.सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 10 =