You are currently viewing मळेवाड श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन कार्यक्रम ०५ मार्चला

मळेवाड श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन कार्यक्रम ०५ मार्चला

सावंतवाडी
मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरात शुक्रवारी  दि.०५ मार्च रोजी महाराजांचा प्रकट दिन कार्यक्रम आयोजित केला आहे.
याबाबत मळेवाड-कोंडुरा गावचे सरपंच मराठे यांनी या संदर्भात येथील दोन्ही ट्रस्टची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केली होती.
कार्यक्रमाला भाविकांनी गर्दी न करता कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी महाप्रसाद व करमणुकीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच प्रसाद म्हणून भाविकांना झुणका भाकर पार्सल स्वरूपात दिला जाईल, असे बैठकीत ठरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा