*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल*
*झाले*
जगता जगता जगलो हे का जगणे झाले?
जितेपणी या जगण्याचेही मरणे झाले!
खेळ मांडला होता वाटे जिंकू सहजच…
कशी उलटली बाजी आणिक हरणे झाले!
आवडायची नितांत मजला माझी म्हणुनी,
कुठे मिळाली ती भलतीला वरणे झाले!
पंगतीत मी होतो गेलो मोठ्यांच्या अन्
उपाशीच आलो मी वापस बघणे झाले!
करीत राहिलो उगाच तुलना यासी त्यासी
बिनकामाचे संसारी मग झुरणे झाले!
*जयराम धोंगडे*
