*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ सरिता परसोडकर लिखित अप्रतिम भक्ती गीत*
*उघड देवा नवविध भक्तीचे तू द्वार*
तुच माझा सखा आणि तुच तारणहार
उघड देवा देहाचे या नवविध भक्तीचे तू द्वार..
तुच कर्ता आणि करविता तुच मायबाप
लोभरुपी संसाराचा मिटव आता ताप
जीवा शिवाचे मिलन होता काय कमी पडणार
उघड देवा देहाचे या नवविध भक्तीचे तू द्वार ..
कुठे जर मी कमी पडले तर हात मज देसी
अहंकार रुपी देह माझा कधी मांडीवर ना घेशी
काया ,वाचा ,मनाने, या सदा तुला स्मरणार
उघड देवा देहाचे या नवविध भक्तीचे तू द्वार..
जीव माझा उद्धाराया करू पाहते क्रांती
अडकून पडलो देहामध्ये मीळे कुठे ना शांती
नऊ द्वारा मधून घुमू दे आता भक्तीचे ते सार
उघड देवा देहाचे या नवविध भक्तीचे तू द्वार..
सौ परसोडकर पुसद
