सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न शासकीय व खाजगी विना अनुदानीत विद्यालये, महाविद्यालये सुरू करण्यास कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजीच्या परिपत्रकानुसार मान्यता दिली आहे. सदर वर्ग सुरू करण्यापूर्वी सर्व संबंधित अध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोविड – 19 चाचणी करणे आवश्यक आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता विधान संहिता कलम 188,269,270,271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतुदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील असे आदेश के.मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकार तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी दिले आहेत.