You are currently viewing विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात नेमळे तर माध्यमिक गटात कळसुलकर प्रथम…

विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात नेमळे तर माध्यमिक गटात कळसुलकर प्रथम…

सावंतवाडी

रोटरी क्लब, सावंतवाडी आणि भोंसले नॉलेज सिटी यांच्या सयुक्त विद्यमाने घेतलेल्या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात नेमळे तर माध्यमिक गटात कळसुलकर प्रथम क्रमांक पटकाविला. रामन प्रभावाचा शोध” लावणारे सर सी. व्ही. रमण यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून भारत भर साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधुन रोटरी क्लब, सावंतवाडी आणि भोंसले नॉलेज सिटी यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात नेमळे हायस्कूलने व माध्यमिक गटात कळसुलकर इंग्लिश स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. चराठे येथील भोसले नॉलेज सिटी संस्थेच्या सभागृहात या विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले तसेच सावंतवाडी रोटरीचे अध्यक्ष रो. डॉ. राजेश नवांगुळ, सचिव रो. दिलीप म्हापसेकर, रो. प्रणय तेली उपस्थित होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचे विज्ञान प्रदर्शन थोड्या वेगळ्या स्वरूपात घेण्यात आले. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रतिकृती शाळेतच तयार केल्या व परीक्षकांनी प्रत्येक शाळेत जाऊन त्यांचे परीक्षण केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, पारितोषिक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात खालील विद्यार्थी- विद्यार्थीनी विजयी झाल्या. (गट पाचवी ते सातवी) देवश्री जयवंत वेंगुर्लेकर व कांचन राजाराम घोंगे – नेमळे हायस्कूल प्रथम क्रमांक, निलेश जयवंत मिस्त्री व रोहन संजय परब – मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव द्वितीय क्रमांक, राहिणी रोशन राऊत – यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल तृतीय क्रमांक. (गट आठवी ते दहावी) पार्थ राजेश वाडकर – कळसुलकर इंग्लिश स्कूल प्रथम क्रमांक, पलाशा राजन सामंत – नेमळे हायस्कूल, द्वितीय क्रमांक, सिद्धी कोंडू बरागडे – माध्यमिक विद्यालय माडखोल तृतीय क्रमांक, फैझा बेग व अस्मा तडवी – सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी उत्तेजनार्थ क्रमांकाने गौरविण्यात आले. तसेच यावेळी या प्रदर्शनात उत्स्फूर्तपणे सहभागी होत नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्याबद्दल माडखोल प्राथमिक शाळा क्र. ६ ची विद्यार्थिनी अनुष्का तेली व शिक्षक दत्‍ताराम सावंत यांचा विशेष पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. त्याच बरोबर रामगड हायस्कूल मालवण येथील उपक्रमशील शिक्षक महादेव पवार यांनीही या कार्यक्रमात सहभागी होत त्यांच्या शाळेची राष्ट्रीय स्तरावर नावाजलेली प्रतिकृती चित्रफीतिद्वारे मांडली. त्यांचाही यावेळी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमा दरम्यान सावंतवाडी रोटरी क्लबमध्ये नव्याने रोटरीत दाखल झालेल्या सदस्यांना “रोटरी पिन” डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. संग्राम पाटील यांच्या हस्ते लावून त्यांचे रोटरीत स्वागत करण्यात आले. यामध्ये रो. विनया बाड, रो. डॉ. अभिजित चितारी, रो. डॉ. स्नेहल गोवेकर, रो. डॉ. अभिजीत वझे, रो. डॉ. रेवणसिद्ध खटावकर यांचा समावेश होता. नगराध्यक्ष संजू परब त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रतिकृतींचे कौतुक केले व अशा उपक्रमांसाठी येणाऱ्या काळात नगरपालिकाही पुढाकार घेईल असे आश्वासन दिले. संग्राम पाटील यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व विशद करत कोरोना काळात सुद्धा विद्यार्थी व शाळांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. डॉ. राजेश नवांगुळ यांनी विज्ञान प्रदर्शनाचा हा उपक्रम सावंतवाडी रोटरी यापुढे दरवर्षी “सिग्नेचर प्रोजेक्ट” म्हणून राबविला जाईल अशी घोषणा केली. कार्यक्रमाला पारितोषिक प्राप्त विद्यार्थी, शिक्षक, पालक व रोटरी सदस्य उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनाचे परिक्षण भोंसले नॉलेज सिटीचे प्रा.अमर प्रभु, प्रा.अमेय मडगावकर रोटरी क्लब, सावंतवाडी वतीने रो.दिलीप म्हापसेकर आणि रो.वसंत करंदीकर यानी केले. तर या सर्व कार्यक्रमाचे नियोजन नितीन सांडये यानी केले. सूत्रसंचालन प्रा.अमर प्रभू यांनी ओघवत्या शब्दात केले तर आभार प्रदर्शन रोटरी सचिव रो. दिलीप म्हापसेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा