You are currently viewing ‘कर्मयोगी’, संघटन शरण कार्यकर्ते नवनिर्वाचित खासदार विनोदजी तावडे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा च्या वतीने सत्कार…

‘कर्मयोगी’, संघटन शरण कार्यकर्ते नवनिर्वाचित खासदार विनोदजी तावडे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा च्या वतीने सत्कार…

‘कर्मयोगी’, संघटन शरण कार्यकर्ते नवनिर्वाचित खासदार विनोदजी तावडे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा च्या वतीने सत्कार…

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस, नवनियुक्त राज्यसभा खासदार *मा. विनोदजी तावडे साहेब* दिनांक *१२ मे २०२६* रोजी जिल्ह्यात येत असून त्यांचा जिल्हा भाजपाच्या वतीने *स्वागत आणि सत्कार सोहळा* दिनांक *१२ मे २०२६* रोजी दुपारी *ठीक ३.००* वाजता *प्रहार भवन,कणकवली* येथे मा. खासदार नारायणराव राणे यांच्या हस्ते, पालकमंत्री नितेशजी राणे आम प्रमोद जठार, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मा.आम अजित गोगटे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

“कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवला तर योग्य वेळ आली की यश समोर येऊन उभे राहते” यांचे उत्तम उदाहरण मा खासदार विनोद तावडे साहेब!
अभाविप (ABVP) पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांना एक शिस्तबध्द संघटन कौशल्य देऊन गेला. कार्यकर्त्यांशी संवाद हे त्यांचे स्किल- तावडे साहेब यांचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद असतो. पक्षाची विचारधारा तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. दहा वर्षापूर्वी युतीमुळे तिकीट नाकारले गेले तरीही पक्षाची विचारधारा सोबत घेऊन पक्षात दिले ते काम केले. आजही लोकांच्या मनात त्यांनी शिक्षण , उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणून केलेलं कार्य स्मरणात आहे. त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करणे, मराठी शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर (Apps), आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
*उत्तम निवडणूक व्यवस्थापक -*
निवडणुकीच्या काळात सूक्ष्म नियोजन (Micro-planning) आणि बूथ स्तरावरील व्यवस्थापन करण्यात ते निष्णात मानले जातात. बिहार निवडणुकीत त्यांनी ते सिद्ध केले. तावडे साहेब म्हणजे एक उत्तम समन्वयक म्हणून प्रसिद्ध आहेत ‌. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि तरुण कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधण्याचे काम ते प्रभावीपणे करतात हा संघटनात्मक पैलू आम्हाला भावतो. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आणि नवनिर्वाचित राज्यसभा खासदारपदी नेमणूक करण्यात आली त्या पार्श्वभूमीवर त्यांचा भाजप सिंधुदुर्ग तर्फे सत्कार सोहळा संपन्न होणार आहे या प्रसंगी सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडल अध्यक्ष, जि.प /पं. स.सदस्य,नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, तावडे प्रेमी उपस्थित राहतील अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा