You are currently viewing सार्वजनिक ब्राह्मणी तिर्थक्षेत्र, आंबेखणवाडी डेगवे, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग जाहीर नम्र आवाहन

सार्वजनिक ब्राह्मणी तिर्थक्षेत्र, आंबेखणवाडी डेगवे, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग जाहीर नम्र आवाहन

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावातील आंबेखणवाडी येथे वाडीच्या मध्यवर्ती “सार्वजनिक ब्राह्मणी तळी” आहे. या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ प्रतिवर्षी ब्राम्हण भोजन, श्री सत्य नारायणाची महापुजा, प्रतिवर्षी श्रावण महिन्यात सप्त सोमवारचे व्रत करणे, त्यानंतर ७ व्या सोमवारी ग्रामदेवता श्री माऊली पंचायतन देवता तसेच,४८ खेड्यांचा श्री स्थापेश्वर, महालक्ष्मी देवतावर, व स्थलाधिपती श्री ब्राह्मणी, स्थळात “अभिषेक करणे”, गौरीचा कार्यक्रम, वटपौर्णिमा, गोपाळमळी येथे प्रतिवर्षी सार्वजनिक गोठण जेवण करणे, प्रतिवर्षी नोपादर येथील इश्वटी येथील होळी घालणे असे पारंपरिक धार्मिक कार्यक्रम ग्रामस्थ नित्यनेमाने आयोजित करतात. शिवाय स्थानिक ग्रामस्थांचे प्रतिवर्षी श्रावणात प्रत्येक सोमवारी रात्रीचे भजन, पुजन असते. शिवाय या ठिकाणी विविध सभा घेतल्या जातात.


त्यामुळे या ठिकाणी मे १९८८ मध्यें “सार्वजनिक तुळशीवृंदावन” बांधून घेतले आहे. त्यानंतर मे१९९९ मध्ये पाण्याचे “जलकुंभ” बांधून घेतले. २००४ मध्ये सार्वजनिक तळीच्या परीसराच्या भोवताली दगडी कंपाउंड बांधले. २००८मध्ये पश्चिमेच्या एका बाजूची “पत्राशेड” बांधली आहे. वाडीचे एकात्मकतेचे प्रतिक असलेल्या या ब्राह्मणी स्थळाची किर्ती सर्व दुरवर पंचक्रोशीत पसरली आहे.
अशा या आंबेखणवाडीचे आपण सर्वजण सुपुत्र आहोत. हे आपले सर्वाचे परम भाग्य आहे. आपल्या सर्वाच्याच पुर्वजांनी दुरदृष्टी ठेवून निर्माण केलेल्या व या वाडीत रहाणा-या सर्व ग्रामस्थांच्या प्रत्येक कुटुंबातील सर्व लहान, थोर मंडळी, नोकरी व्यवसाय करणाऱ्या ग्रामस्थांना नेहमी सुख समाधान व शांती लाभत आहे. त्या श्रध्देवरच आपण सर्वजण आपले दैनंदिन जीवन जगत आलो आहोत.
अशा या ब्राह्मणी स्थळात मकर संक्रांतीचे औचित्य साधून शुक्रवार दि.१५ जानेवारी २०२१ रोजी स्थानिक ग्रामस्थांची सभा आयोजित केली होती.


सदर सभेत पुर्वेकडील व उर्वरित बाजूचे काम एका – दोन आठवड्यात निधी संकलना नंतर सुरु करण्याचे सर्वानूमते ठरले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कामासाठी आंबेखणवाडीतील प्रत्येकी स्थानिक ग्रामस्थ कुटुंबा कडून चुलीप्रमाणे कमीत कमी रु.१०००/- लोक वर्गणी धरली आहे.
शिवाय या वाडीतील नोकरी, व्यवसाय, पेन्शनधारक, असणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांनी हितचिंतक असणाऱ्या ग्रामस्थांनी आपल्या मेहनतीने कमविलेल्या रक्कमेचा अल्पसा हिस्सा या कामासाठी द्यावा अशी आग्रहाची विनंती आहे. प्रत्येक ग्रामस्थांनी कमीत कमी प्रत्येकी किंवा कुंटुबातील व्यक्तीकडून रुपये ५,०००/- किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्त देणगी देऊन या कामासाठी आपले अमुल्य योगदान देऊन सहकार्य करावे असे विनम्रपणे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबईतील व इतर हितचितक देणगी दात्याने आपली देणगी
गुगल पे ने मोबाईल क्रमांक 9869720936 वर श्री.उल्हास देसाई,
बँक आँफ महाराष्ट्र,
जीएसटी भवन शाखा,
माझगाव,
ifcs code mahb0001387,
खाते क्रमांक 20115804345
यांच्याकडे पाठवावे व त्याची प्रत त्यांच्या वाँटसफवर पाठवावी अशी विनंती करण्यात येत आहे. सदर देणगीदाराना त्त्याची त्वरित पोच पावती दिली जाईल.
सदर ब्राह्मणीतिर्थ पत्राशेड व इतर सुशोभिकरण करणांस अंदाजे दोन-ते तिन लाख खर्च अपेक्षित आहे. आपण ज्या भुमीत जन्मलो..! ज्या मातीत वाढलो…!!ज्या भुमीतील लहानपणी पाणी प्यायलो…!!!त्याभुमीचा विकास व्हावा, अशी सर्वाची मनापासून इच्छा आहे.पुर्वजांनी पाया घातला. आपण त्यांचे रक्षण करुन त्या पवित्रभूमीवर कळस चढविणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.आपण आयुष्यात कुंटुबासाठी खुप कमवतो. परंतु अशा सार्वजनिक कामास ग्रामस्थांनी, मनापासून आर्थिक हातभार लावणे हे प्रत्येकाचे करतव्य आहे. व इतर भाविकांनी या स्थळावर अपार श्रध्दा असणा-या, आमच्या आत्या, बहिणी यांनी व अन्य विवाहीत माहेरच्या मुलीनी, लोकांनी, हितचिंतकानी, आपली बहुमोल देणगी देऊन हा एकदाचा संकल्प पुर्ण करावा अशी नियतीची मनोमन इच्छा आहे.
सदर ब्राह्मणीस्थळ ४८ खेड्यांच्या श्री स्थापेश्वर मंदिर पासून सुरु असलेल्या डेगवे, आंबेखणवाडी डिंगणे रस्त्यावर आहे. शिवाय या स्थळावर गावातील नोपादरा देवस्थानचा वरदहस्त, लाभला आहे. अशा या देवस्थानाची पुजा सद्या वामन सहदेव देसाई व इतर ग्रामस्थ नित्य नेमाने करीत आहेत.
तरी या ब्राह्मणीस्थळातील पवित्र कार्यास डेगवे गावातील सर्वांनी कर्तव्य भावनेतून आर्थिक सहकार्य देऊन ब्राह्मणी स्थळी सेवा करावी.शिवाय संबंधीत परीचय असणाऱ्या हितचिंतकाना सांगून आर्थिक सहकार्य करावे;सदर आर्थिक सहकार्य श्री शामसुंदर गणपत देसाई यांच्याकडे किंवा खालील नमूद केलेल्या व्यक्तीकडे द्यावी अशी कळकळीची समस्थ आंबेखणवाडी ग्रामस्था तर्फे नम्र विनंती आहे.

समस्थ आंबेखणवाडी ग्रामस्थ व कार्यकारी मंडळाच्या वतीने…..
उल्हास बाबाजी देसाई.
7588418026/9869720936/
मंगलदास नागबा देसाई
9421145155

टिप: जर एखाद्या देणगीदाराला, ग्रामस्थ बांधवांना, हितचितंकाना, रेती, खडी, माती, सिमेंट, पत्रे, दगड, प्रवेशद्वारा करीता लागणारे साहित्य, लोखंडी साहित्य, मजूरी वैगरे इतर सामानाच्या खर्चाचा भार किंवा देणगी स्वरूपात द्यायची असेल तर त्त्या देणगीदारयाचे सहर्ष स्वागत आहे. त्याने सहकार्य करावे. त्या देणगीदाराची योग्य ती नोंद घेतली जाईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा