You are currently viewing राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती समाज गौरव पुरस्काराने नवलराज काळे यांचा सन्मान

राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती समाज गौरव पुरस्काराने नवलराज काळे यांचा सन्मान

*राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती समाज गौरव पुरस्काराने नवलराज काळे यांचा सन्मान*

*माजी सामाजिक न्याय मंत्री मा.चंद्रकांत हांडोरे यांच्या शुभहस्ते कोल्हापुर इचलकरंजी येथे शाहू महोत्सव 2023 कार्यक्रमात पुरस्काराचे करण्यात आले वितरण*

*कोल्हापूर-* 22 डिसेंबर 2023 रोजी इचलकरंजी येथे संपन्न होत असलेल्या शाहू महोत्सव 2023 च्या भव्य कार्यक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय नवलराज विजयसिंह काळे यांना माजी सामाजिक न्याय मंत्री मा.चंद्रकांत हांडोरे यांच्या शुभहस्ते *राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती समाज गौरव पुरस्कार 2023* हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नवलराज काळे हे गेले अनेक वर्ष समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी परिवर्तनवादी चळवळीत घट्टपणे पाय रोऊन कार्यरत आहे.काळे यांनी लोकशाही समाजवाद वैज्ञानिक दृष्टिकोन धर्मनिरिक्षता आणि राष्ट्रवाद या शाश्वत मूल्यांची पेरणी जनमानसात करण्यासाठी सामाजिक उपक्रमातून सातत्याने यशस्वीरित्या कार्य केले आहेत. व करत आहेत जे प्राप्त परिस्थितीच्या योग्य आकलन करून तात्कालीन समस्यांना भिडतात व आपल्या परीने परिवर्तनाच्या प्रक्रियेला गतिमान करतात. त्याचप्रमाणे नवलराज काळे यांचे कार्य विचारांच्या लढाईला पुढे नेणारे आहे. सामाजिक क्षेत्रात अधिक प्रमाणात तरुण-तरुणी प्रत्यक्षात येण्यासाठी नवलराज काळे हे तनमन धना ने आपल्या सहकाऱ्यांसह कृतिशील राहिले आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी लोकराजा शाहू महाराज चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी कोल्हापूर यांच्या वतीने शाहू महोत्सव 2023 कार्यक्रमात राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती समाज गौरव हा पुरस्कार प्रदान करून त्यांचा यथोजीत गौरव करण्यात आला.
यावेळी नवलराज काळे असे म्हणाले की,ज्या राजाने अस्पृश्यता मिठवली, ज्या राजाने आपल्या राज्यातील जनतेच्या पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले ,ज्या राजाने भारतरत्न घडवले, ज्या राजाने आरक्षणाची पहिली सुरुवात केली,ज्या राजाने बहुजनांना तारले, ज्या राजाने हयात भर लोकांसाठी लोकांमध्ये राहून काम केलं अशा लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाचा समाज गौरव पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे.शाहू महाराजांच्या सैन्य दलात आमचे नातेवाईक देखील समाविष्ट होते त्यात माझ्या आजीचे वडील (महाराजांचे चित्यांना शिकारीची ट्रेनिंग देण्यासाठी कार्यरत होते) आजीचे आजी असे अनेक जण शाहू महाराजांचे निकटवर्तीय होते ज्या शाहू महाराजांनी त्यावेळी शासकीय निधीतून धनगर आणि मराठा समाजातील वधू-वरांची लग्न लावून देऊन आपल्या राज्यात सामाजिक समानता राखण्याचा प्रयत्न त्यावेळी केला. लोकांमध्ये राहून लोकांची कामे करणारा लोक राजा म्हणून त्यांची ओळख आज या पृथ्वीतला वरती आहे. अशा महान थोर विचारवंताच्या नावाचा पुरस्कार माझ्यासाठी निश्चितपणाने प्रेरणादायी आहे निश्चितपणाने राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याला प्रेरित होऊन समाजात करत असलेले कार्य या गौरवाने अधिकाधिक उंचावत जाईल आणि माझ्या शाहू राजाने केलेल्या कार्याची झलक पुन्हा एकदा या पृथ्वीतला वरती माझ्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने पुन्हा एकदा घडवून आणण्यासाठी हा पुरस्कार मला प्रेरणा देईल यात तीळ मात्र शंका नाही असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पुरस्कार स्वीकारत असताना नवलराज काळे यांच्यासोबत त्यांचे वडील विजयसिंह काळे, सौभाग्यवती विशाखा नवलराज काळे, व्यासपीठावरील मान्यवर सुनील जावळे, अरुण कांबळे अक्षरा कांबळे बाबू अपराज प्रथमेश कांबळे प्रज्ञा कांबळे मंथन गोठावळे, संदीप भातमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 12 =