रोजगार मेळाव्याचे 16 मे रोजी आयोजन
जास्ती जास्त युवकांनी लाभ घ्यावा – अ.ई.तडवी
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी व मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी येथे PM National Apprenticeship अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये स्थानिक कंपन्यांचा सहभाग असून 20 पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या मेळाव्यात आयटीआय सर्व ट्रेड उमेदवारांसाठी विविध क्षेत्रांमध्ये भरती केली जाणार आहे. उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहताना आपला बायोडेटा (Resume) तसेच आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्र ,ओळखपत्र इत्यादी) सोबत आणावीत. या रोजगार मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपलब्ध रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी अ.ई. तडवी यांनी केले आहे.
