नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांची कुडाळ एम.आय डि.सी.इंडस्ट्रीज असोसिएशनला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन
कुडाळ
माझ्या पक्षाने आणि नेत्यांनी मला कोकणातील जनतेच्या समस्या समजून घेऊन सरकारच्या माध्यमातून त्या सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही संधी दिलेली आहे.मुळात माझी जडणघडण ही सर्वसामान्य कुटुंबातूनच झालेली असल्याने सामान्यांच्या प्रश्नांची मला जाण आहे आणि आपण आता आमदार असलो तरी एक उद्योजकही आहे त्यामुळे कुडाळ एम.आय डि.सी.इंडस्ट्रीज असोसिएशनचे आणि उद्योजकांचे जे प्रश्न असतील ते प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण आग्रही असू असे आश्वासन नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांनी दिले.
विधान परिषदेवर निवड झाल्यावर आज ते पहिल्यांदाच जिल्ह्या दौऱ्यावर आले होते.आमदार जठार असेही म्हणाले की या जिल्ह्यात नवीन उद्योग आले पाहिजेत आणि जुन्या व बंद असलेल्या उद्योगाना उर्जितावस्था आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यानी सांगितले.
कुडाळ एम.आय डि.सी.इंडस्ट्रीजच्या वतीने आज कुडाळ शासकीय विश्रामगृह येथे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार जठार यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छां दिल्या.यावेळी कुडाळ एम.आय डि.सी.इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री मोहन होडावडेकर, कार्यवाह अँड.नकुल पार्सॅकर, उपाध्यक्ष डॉ.नितीन पावसकर, सल्लागार श्री आनंद बांदिवडेकर, पदाधिकारी श्री राजन नाईक,प्रमोद भोगटे,सौ.सुक्रीना डिसोझा,उद्योजक श्री निलेश धडाम,किशन बिश्न्नोई,श्री हर्षवर्धन बोरावडेकर, श्री आग्नेल फर्नाडिस,तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष श्री रणजित देसाई आदी उपस्थित होते.
