*जागतक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
वृत्त मुद्रिका.(पहिला चरण. १०+११
दुसरा चरण १४+१३)
*पसारा*
मी आयुष्याचा मांडियला पसारा
सहज माझ्या मनी आले किती क्षणांचा ढिगारा..
काय वेचावे नि कोणते सोडावे
कळेना माझे मला मी कसे जीवना
पहावे…
किती रंग रेषा रेघोट्या पाहते
गुंता अनेक प्रश्नांचा गतकाळाचा
उसवते..
त्या अगणित मुद्रा ज्यांनी मज
घडविले
दृष्यमान होता लहरी मनोमनी
भारावले…
मी सक्षम की मी प्रवाहपतित
दुबळी
संघर्ष टाळला मी तर असे संस्कार बावळी..
धगधग नव्हती का कधीच मम
अंतरी
तो जाळ का मी विझविला जपल्या लयी सूरसरी..
आल्या गेल्या त्या क्षणांचा भार नको
पुन्हा वाळल्या जखमांची कातडी निघाया नको..
आवरते आता हा पसारा सारा
बंद पेटीत राहूदे नको चालना
विचारा
ऐवज तोषाचा फक्त सांभाळावा
पुन्हा एकदा सोनेरी सूर्य उतरता
पहावा
*राधिका भांडारकर*
