You are currently viewing प्रमोदजी जठार यांच्या स्वागतासाठी वेंगुर्ल्यात भव्य जल्लोष

प्रमोदजी जठार यांच्या स्वागतासाठी वेंगुर्ल्यात भव्य जल्लोष

प्रमोदजी जठार यांच्या स्वागतासाठी वेंगुर्ल्यात भव्य जल्लोष

विधान परिषद आमदारपदी नियुक्तीनंतर भाजपा कार्यालयात होणार स्वागत सोहळा

वेंगुर्ले :

सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि जनसेवक म्हणून ओळख असलेले माननीय प्रमोदजी जठार यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार (एमएलसी) म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल वेंगुर्ले तालुक्यात भव्य “जल्लोषी स्वागत” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा स्वागत सोहळा गुरुवार, दि. ७ मे २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता भाजपा कार्यालय, वेंगुर्ले येथे उत्साहात पार पडणार आहे. प्रमोदजी जठार यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व जनप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा