You are currently viewing जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२६

जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२६

*💠 जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२६*

.*⭕महादेवाचे केरवडे येथे रंगणार नृत्याचा जल्लोष*

कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथे श्री सिद्ध महादेव मंदिर यात्रेनिमित्त शिवतेज ग्रुपतर्फे जिल्हास्तरीय भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजता मंदिर परिसरात पार पडणार असून जिल्ह्यातील नृत्यप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे.

या स्पर्धेत दोन गट ठेवण्यात आले असून, एक खुला गट आणि दुसरा १२ वर्षांखालील लहान गट आहे. खुल्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे ₹५०००, ₹३००० आणि ₹२००० रोख पारितोषिकांसह ट्रॉफी देण्यात येणार आहेत. तसेच लहान गटासाठी ₹३०००, ₹२००० आणि ₹१००० अशी बक्षिसे निश्चित करण्यात आली आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये पार पडणार असून पहिल्या फेरीत लोकनृत्य किंवा लोककला सादर करणे आवश्यक आहे. पहिल्या फेरीत सादर केलेला नृत्यप्रकार दुसऱ्या फेरीत सादर करता येणार नाही, असे स्पष्ट नियम आयोजकांनी जाहीर केले आहेत. दुसऱ्या फेरीत स्पर्धकांना शास्त्रीय, फ्युजन, फिल्मी किंवा वेस्टर्न नृत्यप्रकार निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. अश्लील किंवा आक्षेपार्ह सादरीकरणास सक्त मनाई करण्यात आली आहे.

लहान गटासाठी ३ ते ५ मिनिटे आणि मोठ्या गटासाठी ५ ते ८ मिनिटांची वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली असून वेळेचे उल्लंघन झाल्यास गुण कपात केली जाणार आहे. स्पर्धकांनी स्वतःचे संगीत (MP3 स्वरूपात) आणणे बंधनकारक आहे.
स्पर्धेचे परीक्षण नृत्य कौशल्य, ताल-समन्वय, सर्जनशीलता, वेशभूषा व सादरीकरण आणि एकूण प्रभाव या निकषांवर करण्यात येणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
नोंदणीसाठी १७ मे २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली असून दोन्ही गटांतील पहिल्या १५ स्पर्धकांनाच संधी मिळणार आहे. ₹२०० अनामत शुल्क ठेवण्यात आले असून ते सादरीकरणावेळी परत दिले जाणार आहे.

स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी गणेश नाईक (९८६०२५२८२५ / ९४२२२६३८०२) आणि सुहास सावंत (९४२०८८८८१३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
या स्पर्धेमुळे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी मोठा मंच उपलब्ध होणार असून परिसरात नृत्याचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.

_________________________
संवाद मीडिया* 

*प्रवेश सुरू… प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….*

*🎓 संजीवनी प्रशिक्षण संस्था, चिपळूण 🎓*

*(संजीवनी डी.एम.एल.टी. व नर्सिंग कॉलेज)*

https://sanwadmedia.com/202701/

*📢 Admission Open 2026–27*

*👉 महाराष्ट्र शासन नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त (Code: 1203)*

*👉 इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, दिल्ली मान्यताप्राप्त*

*🌟 नर्सिंग क्षेत्रात उज्ज्वल करिअरची सुवर्णसंधी!*

*✨ G.N.M. Nursing Course*

*📚 कालावधी: 3 वर्ष*

*✅ 12वी (कोणत्याही शाखेनंतर) प्रवेश उपलब्ध*
*✅ 100%* नोकरीची संधी*

*🏥 उपलब्ध कोर्सेस*

*🔹 GNM Nursing – 3 वर्ष*
*🔹 D.M.L.T. (पॅथॉलॉजी) – 1 वर्ष*
*🔹 AST. N.M. (नर्सिंग) – 2 वर्ष*
*🔹 D.O.T.T. (ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी) – 2 वर्ष*
*🔹 M.P.H.W. (मल्टिपर्पज हेल्थ वर्कर) – 2 वर्ष*
*🔹 रुग्ण सहाय्यक (Patient Assistant) – 1 वर्ष*

*🎯 विशेष वैशिष्ट्ये*

*✔️ 100%* नोकरीची संधी*
*✔️ अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक*
*✔️ अत्याधुनिक प्रॅक्टिकल ट्रेनिंग*
*✔️ हॉस्पिटलशी संलग्न प्रशिक्षण*

*📚 पात्रता*

*👉 8 वी / 10 वी / 12 वी पास किंवा नापास विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र*

*📍 कॅम्पस व पत्ता*

*🏫 वांगडे शॉपिंग सेंटर, दुसरा मजला,
बहाद्दूर शेख नाका, चिपळूण*

*🏫 मंदार कॅम्पस, पेढांबे,
ता. चिपळूण, जि. रत्नागिरी*

🌐 www.sanjeevaniprashikshansanstha.com⁠�

*📞 संपर्क*

📱 7588476381
📱 7218850220
📱 7218850223 / 7276850220

*👉 मर्यादित जागा – आजच प्रवेश निश्चित करा!*

*👉 नर्सिंग क्षेत्रात यशस्वी करिअरची सुरुवात संजीवनीसोबत करा!*

#GNMNursing #NursingAdmission #CareerInNursing #AdmissionOpen2026
#संजीवनी नर्सिंग कॉलेज

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/202701/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा