You are currently viewing सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव हे फुले शाहू आंबेडकर विचार मंच वेंगुर्ला समाज उद्धारक पुरस्कार 2026 चे मानकरी.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव हे फुले शाहू आंबेडकर विचार मंच वेंगुर्ला समाज उद्धारक पुरस्कार 2026 चे मानकरी.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव हे फुले शाहू आंबेडकर विचार मंच वेंगुर्ला समाज उद्धारक पुरस्कार 2026 चे मानकरी.

सावंतवाडी

गेली अनेक वर्ष रवी जाधव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाजसेवा क्षेत्रात कार्यरत आहेत.सावंतवाडी शहर तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये प्रत्येक आपत्तीत मदतीचा हात देण्यासाठी रवी जाधव हे सर्वप्रथम हजर असतात. तसेच ते कॉलेज जीवनापासून समाजातील उपेक्षित समाजासाठी काम करत आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मंत्रानुसार स्वतः उच्च शिक्षण घेऊन समाज संघटित करण्यासाठी त्यानीं दिलेले योगदान फार मोठे आहे. समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी, अंधश्रद्धा या विरोधात त्यांचा लढा निरंतर सुरूचं आहे.समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या पेरणेने त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली. सावंतवाडी शहरांमध्ये स्थापन झालेल्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेचा ते एक महत्त्वाचा भाग बनवून गेली अनेक वर्ष गरजवंत आणि निराधारांना आधार देण्यासाठी झटत आहेत. रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन रुग्णसेवा आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांचे सुरू असलेले काम समाजासाठी आदर्शवत असेचं आहे. समाजातील वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या उद्धारासाठी त्यांच्याकडून सुरू असलेले कामही प्रभावित करणारे आहे. गोरगरीब कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्या पासून ते न्याय हक्कासाठी प्रसंगी आंदोलनासारखा पावित्रा घेऊ नेहमीच न्याय मार्गाने पाठराखण केली आहे. सध्या त्यांच्याकडून सुरू असलेले कार्य महान आहे समाज उद्धारासाठी त्यांच्या कार्याचा ठसा अधोरेखित झाला आहे तसेच ज्येष्ठ समाजसेवक
मा.महादेव (भाऊ) आंदुर्लेकर शिरोडा- मुंबई या दोन समाजसेवकांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना फुले शाहू आंबेडकर विचारमंच तर्फे समाज उद्धारक पुरस्कार २०२६ देऊन गौरवांकित करण्यात आले. तसेच सावंतवाडीचे ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांचा देखील सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रथ समतेचा समूह गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ , सभापती शंकर घार, सरपंच निलेश चमणकर, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, फुले शाहू आंबेडकर विचार मंच अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, सचिव महेंद्र मातोंडकर तसेच ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव, सिंधुदुर्ग कार्याध्यक्ष अनिल जाधव, चंद्रकांत म्हापणकर,आदिती पै, सुहास कोळसुलकर, मिलिंद परब सत्यवान तेंडुलकर सुनील जाधव चैत्राली जाधव असे विविध मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा