You are currently viewing कारच्या धडकेत पिंगुळीत शाळकरी मुलगा ठार…

कारच्या धडकेत पिंगुळीत शाळकरी मुलगा ठार…

कुडाळ

भरधाव कारने ठोकर दिल्याने पिंगुळी-गुढीपूर येथे झालेल्या अपघातात शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. तो सायकलने रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली.

विराज निलेश तेली (वय १०) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ८ वाजता मुंबई-गोवा महामार्गावर घडली. विराज हा येथील आज सुट्टी असल्यामुळे सायकल चालवायला गेला होता. यावे॓ळी रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला. कारचालक हा दोडामार्ग येथील पोलीस कर्मचारी आहे. राजेश वासुदेव गवस असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबतची खबर विराजचे वडील निलेश यांनी पोलिसात दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा