You are currently viewing देवगडातील मीठमुंब्री येथे मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न
Oplus_16908288

देवगडातील मीठमुंब्री येथे मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती; ‘क’ वर्ग दर्जा व रस्त्याच्या विकासासाठी शासन मदतीचे आश्वासन

देवगड :

देवगड तालुक्यातील मीठमुंब्री मधलीवाडी येथे देव मुंब्रेश्वर मुंब्रादेवी ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे बंदर व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, या देवस्थानाच्या उभारणीत मुंबईपासून सिंधुदुर्ग-देवगडपर्यंत सर्वांचे मोठे योगदान आहे. मंदिराला ‘क’ वर्ग दर्जा मिळावा व परिसराचा विकास व्हावा, अशी ग्रामस्थांची मागणी असून शासन दरबारी आवश्यक ती मदत करण्याचा विश्वास त्यांनी दिला.
पर्यटनाच्या दृष्टीने हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते, मात्र मंदिराकडे जाणारा रस्ता ही मोठी अडचण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ता रुंदीकरणासाठी स्थानिकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास शासनाकडून दर्जेदार रस्ता उभारण्याची पूर्ण जबाबदारी आपण घेऊ, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. भाविकांना सुलभ ये-जा होण्यासाठी तसेच पर्यटन वाढीसाठी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर दयाळ गावकर, गणपत गावकर, संदीप साटम, बाळ खडपे, जिल्हा परिषद सदस्य भाई पारकर, ट्रस्टचे पदाधिकारी व अध्यक्ष तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान ट्रस्टच्या वतीने पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्र्यंबक धुरी यांनी केले, तर प्रस्तावना साईनाथ गावकर यांनी मांडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा