*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझा महाराष्ट्र*
सह्याद्रीच्या कुशीत वाढलेले
स्वप्नांचे लौकिक राज्य खास,
शिवबांच्या पराक्रमाने उजळले
हे इतिहासाचे सुवर्ण प्रकाश..
प्रत्येकाच्या श्वासाश्वासातून
वार्यावर मृद्गंध दरवळतो,
परंपरेच्या दृढ विश्वासातून
कणाकणात संस्कृती जपतो..
ध्यास अखंड भक्तीजनांचा
नाद पंढरीच्या वारीत घुमतो,
दिव्य प्रकाश अध्यात्माचा
ज्ञानेश्वर-तुकारामातून मिळतो..
रम्य विलास निसर्गाचा
कोकण सागरकिनारी दिसतो,
हिरव्या साजिर्या डोंगर-दर्यांचा
जीवन सुवास जपतो..
माझा महाराष्ट्र महान
जगभरात नाव उजळतो,
अभिमानाची भूमी म्हणून
प्रगतीचा नवइतिहास घडवतो..
प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
