You are currently viewing माधवबागच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

माधवबागच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बुधवार दि. 9 मार्च 2022 वेळ स.10 ते सायं 6 वाजेपर्यंत

मानवी शरीरातील सर्वांत महत्वाचा अवयव म्हणजे हृदय. व्यायामाचा अभाव, चुकीच्या आहारामुळे, तसेच मधुमेह, ब्लडप्रेशर, अतिरिक्त वाढलेली चरबी यामुळे हृदयरोगाचा धोका वाढत आहे. यावर वेळेत निदान आणि उपचार केल्यास हृदयरोगाचा मोठा धोका टाळता येतो.

वरील सर्व आजारांवर दि. ९ मार्च २०२२ रोजी माधवबागच्या वतीने एका मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये वरील सर्व आजारांवर डॉक्टरांचे मार्गदर्शन, सल्ला आणि ईसीजी, ब्लडप्रेशर, शुगर, बि. एम. आय. असे 750 चे चेकअप पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. नाव नोंदणी आवश्यक आहे. त्याकरिता माधवबाग कुडाळ 9011328581 कणकवली 9373183888 सावंतवाडी 7774028185 संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + two =