You are currently viewing सेवाग्राम येथे गांधीजींच्या सहवासात वं.राष्ट्रसंत तुकडोजी

सेवाग्राम येथे गांधीजींच्या सहवासात वं.राष्ट्रसंत तुकडोजी

 

‘थोर महात्मे होऊन गेले चरीत्र त्यांचे पहा जरा ।

आपण त्यांच्या समान व्हावे

हाच सापडे बोध खरा ।’

भारत देश स्वतंत्र्य व्हावा. या देशातील लोकांना सुखानं जगता यावं. देशाला स्वातंत्र्य मिळावं. यासाठी रात्रंदिवस धडपडणारे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची राष्ट्रासाठी भव्यदिव कामगीरी म्हणजे भारतभर आपल्या भजनातून, प्रवचनातून,किर्तनातून, कर्तृत्वातून आणि सालबर्डी येथे केलेला महायज्ञ, तेथे लाखो लोकांचा पंगती उठल्या आणि अख्ख्या भारतातून अथांग जनसागर पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. काही स्वतःला समाज सुधारक समजणाऱ्या लोकांच्या पोटात गोळा दाटला. त्यांना वाटले तुकडोजी बुवानं लोकांना आपल्या मागे लावून हजारो रुपये पाण्यात घातले. याने भोळ्याभाबड्या लोकांना बणविले. या देशात हजारो लोकांना पोटभर अन्न मिळत नाही आणि या तुकडयानं अन्नाची सारी नासाडी केली.

म्हणून ते म. गांधीकडे गेले. सेवाग्रामला गांधीजी १६ जून १९३६ ला राहायला गेले. त्यांनी बापूंना सांगितले. ” तुकड्या नावाचा एक बुवा लोकांकडून पैसे गोळा करतो. सप्ताह करतो, यज्ञ करतो, व लोकांना फसवतो. ही तक्रार ऐकूण गांधीजींना आश्चर्य वाटले. संत महात्मे जर असे करू लागले तर देशात राष्ट्रीय शक्ती कशी निर्माण होईल. पीड पराई जाणणारे लोकं असे करीत नसतात. हे खरे की खोटे याची शहानिशा केली पाहिजे. म्हणून महात्माजींनी महाराजांची चौकशी करण्याचे ठरविले. त्यांनी नागपूरचे शंकरराव टिकेकर व बाबूराव हरकरे यांच्याकडे हे काम सोपवले की “खरंकाय ते तुम्ही शोधून काढा व मला सांगा नंतर मी माझा निर्णय देईन ” राष्ट्रसंताचं तनमन देश स्वतंत्र करण्यासाठी पेटून उठलं होतं. त्यामूळे महाराज सतत फिरतीवर होते. सालबर्डी यज्ञानंतर त्यांची कीर्ती मध्यप्रांत व-हाड मध्ये पसरली होती. लोकं त्यांना उसंत घेऊ देत नसत. काहीदिवस महाराजांचा मुक्काम मुलताई येथे होता. त्या ठीकाणी नागपूर नगरीचे श्री शंकरराव टिकेकर व बाबुराव हरकरे गेले. त्यांनी महात्माजींचा निरोप महाराजांना दिला. ” आपल्याला गांधीजींनी आश्रमात बोलावले आहे. तुम्ही आलेच पाहिजे असा आग्रह आहे.” महाराजांना आनंद झाला. एवढया मोठ्या थोर महात्म्यांनी आपल्याला बोलावलं. म्हणजे आपण अवश्य जाऊ. ” आम्ही गांधीजींना भेटायला येऊ”. असा निरोप त्यांनी दिला. गांधीजी नुकतेच सेवाग्रामला भेटायला गेले होते. सध्या सेवाग्राम आश्रमात ‘आनदंनिवास ‘ नावाची झोपड़ी तेवढीच बांधून झाली होती. तिथे फक्त महात्माजी कस्तुरबा इतर एकदोन सहकारी राहायला आले होते. त्या एकाच झोपडीतून सर्व कामे चालत होते. महाराज व नारायण नावाचा एक सतरा वर्षाचा सेवक असे दोघे ऑगस्ट १९३६ ला सेवाग्रामला आले. आश्रमात येताच म. गांधी व कस्तुरबा यांनी त्यांचे स्वागत केले. “आता तुम्ही इथेच महिनाभर रहा ” असे ते म्हणाले आदिनिवासात महाराजांची राहण्याची व्यवस्था केली होती.

महाराज दररोज चार वाजता ऊठत प्रातर्विधी, प्रातःस्मरण, प्रार्थना, गीतापाठ पाचवाजे पर्यंत आणि सहा ते सात पू. बापूजी, वं.राष्ट्रसंत, सरहद . गांधी, ही सर्व मंडळी एकतास फिरायला जात. नंतर स्नान, ध्यान करून मग अकरावाजेपर्यत मनू गांधीला भजन शिकवित. एवढं सगळं करतांना महाराजांचं लक्ष आश्रमाच्या साफसफाईकेडे झाडे, वेली, वृक्ष यांच्या संगोपनाकडे सुद्धा असत. भोजन झाले की त्यानंतर तीन वाजेपर्यंत ते वर्तमानपत्रे वाचीत,लिखान करी, सुतकताई करी. चार ते पाच वाजेपर्यंत खेड्यातून आलेल्या लोकांसी विचार विनिमय चर्चा सर्व गोष्टींचा आढावा घेत.पू. महात्माजी व वं. महाराज सोबतच भोजन करीत असत. आठ ते नऊ वर्ध्यावरून आलेल्या कार्यकर्त्यांशी गांधीजी व महाराज विचार विनिमय करी. देशातील सर्व घडामोडी व कार्माचा आढावा तेथूनच होत असे. महाराज रोज पू. महात्माजीं ना भजने, श्लोक, अभंग, सुविचार म्हणून दाखवत. रोज महाराज आश्रमात सामुदायिक प्रार्थना, ध्यान धारणा होत असत.’ लहरी की बरखा ‘ हे पुस्तक वं. महाराजांनी सेवाग्रामच्या आश्रमातच लिहले. त्यांचे विचार वागणे पाहून गांधीजी खूपच आनंदी व खूष होत असे. महाराजांमधले दिव्यत्व त्यांचे थोर कर्तृत्व आणि अलौकिक ज्ञान,जनतेच्या कल्याणासाठी, देशाच्या स्वातंत्रयासाठी त्यांच्या मनात असलेली तळमळ, राष्ट्रभक्ती, जिव्हाळा, प्रेम, संवेदनशिलता, आपुलकी, प्रामाणिककष्ट यामूळे महात्माजी खूपच प्रभावित झाले होते. ते जेव्हा महाराजांना ऐकत तेव्हा महात्माजींचे भान हरपून जात. ते मंत्रमुग्ध होत असे. महाराजांच्या वाणीमध्ये किती मधुर गोडवा आणि गहन अर्थ आहे. त्यांचे शब्द म्हणजेच जणूकाही अमृतवाणीच असे. महाराजांच्या अलौकिक काव्यशक्तीची जाण महात्माजींना झाली होती. त्यांना आश्चर्य वाटले. तुकडोजी हा ढोंगी बुवा नसून लोक कल्याणासाठी, देशहितासाठी तळमळणारा थोर महात्मा आहे. याची खात्री बापूंना पूर्णपणे पटली होती. राष्ट्रीय कार्यासाठी यांची सर्व शक्ती एकवटली असून देवभक्ती व देशभक्ती यांची प्रज्वल आहे. त्यांचे महान कार्य पूज्यनीय आहे. एकदा महराजांचे भजन ऐकता – ऐकता महात्मा जीचे मौन तुटले हे त्यांना कळलेच नाही. महाराजांजवळ, खंजरी, एकतारी, चिवळ्या होत्या. एकदा महराजांना १०५ डिग्री ताप असतांनी सुद्धा त्यांनी भजनाचा कार्यक्रम रद्द केला नाही. याचे गांधीजींना फार मोठे आश्चर्य व कौतुक वाटले होते. तेव्हा गांधीजीना त्यांच्या मनातील लोक जागृतीची, देशाच्या उत्कर्षाची ज्वाला जाणवली. आश्रमात लोकांची खूप गर्दी वाढू लागली; कारण राष्ट्रसंत आश्रमात राहात आहे हे लोकांना माहिती होऊ लागले. त्यांचे भजन ऐकून सारे मंत्रमुग्ध होऊन जनजागृती होत होती. त्यांच्या खंजरीची थाप म्हणजे दिव्यत्व होते.

“हर देश मे तू, हर भेष मे तू ।

तेरे नाम अनेक तू एकही है ।

तेरी रंगभूमी यह विश्वभरा,

सब खेल मे, मेल मे तूही तू है । ” माणसा माणसात देव शोधणारा थोर संत. मानवतेचा महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महात्माजींना प्रभावित करीत होता. महाराजांना जेव्हा खूप ताप होता तेव्हा महात्माजी कितीदा तरी ऊठून त्यांच्याजवळ जाऊन अंगाला हातलाऊन पाहात असे. त्यांची औषध पाणी देऊन सेवाशुश्रूषा करीत असे. महात्माजी महाराजांवर खूप प्रेम करू लागले. महाराज एक दिव्य अनुभूती आहे याची जाणीव महात्माजींना झाली होती यांचा एकही क्षण वाया जात नसून तो सतत जन कल्याणासाठी झटत असून यांना मानवाच्या हिताचे वेड लागले आहे. खरोखर ते देवरूप अवतार आहे. त्यांचे हृदय संताचे आहे. सेवाग्रामच्या आश्रमात देशातील थोर पुरुषांची कार्यकर्त्यांची रोज ये जा असत. पं. नेहरूजी, डॉ. आर्यनायकम, प्यारेलालजी, मीराबेन, राष्ट्रमाता कस्तुरबा असे सर्वच थोर व्यक्ती तेथे येत त्यामूळे महाराजांच्या भजनाने सर्वच एकदम प्रभावित होत. ” मै गांधीजीका नही शिष्य रहा ।

ना गांधी मेरे कही भक्त रहे ।

पर प्रेम था हम दोनों में बड़ा, वह मिटा न सका कोई लाख कहे । ”

ज्यावेळी महाराज आ श्रमातून परत येण्याचा दिवस होता त्यावेळी सर्व लोक एकत्र आले. महात्माजी, कस्तुरबा, सरहद्द गांधी, मनूगांधी, सर्व कार्यकर्ते, गावखेडाचे लोकं, समारोपाचा कार्यक्रम झाला. सर्वांचे डोळे भरून आले. कोणीच अश्रूंना रोखू शकत नव्हते. महाराज टांग्यात बसले. एक संत, एक महात्मा डोळेभरून एकमेकांना पहात होते. गांधीजी पुढे आले कडाडून महाराजांना मीठी मारली. त्यांना अश्रू आवरता आले नाही. त्यांच्या नेत्रातून अ श्रूंचा बांध फुटला. असे माणसात देव शोधणारे मान वतेचे महान पूजारी थोर संत वं. तुकडोजी महाराज व मं. गांधीजींच्या फक्त एक महिण्यांच्या सहवासात हृदयात जाऊन बसले.. त्यांच्या जंयती निमित्य कोटी – कोटी वंदन करूया त्या राष्ट्रसंतांना🙏

जयगुरू🙏

 

ज्योती वामन बन्सोड -पांगुळ

(ग्रामगीताचार्य ) बेलोना,

मो. 7030789305

प्रतिक्रिया व्यक्त करा