You are currently viewing दिव्यांग बांधवांचे ढोलबजाव आंदोलन

दिव्यांग बांधवांचे ढोलबजाव आंदोलन

*दिव्यांग बांधवांचे ढोलबजाव आंदोलन*

दिव्यांग विकास फाउंडेशन प्रणित हक्क समिती सिंधुदुर्ग. ही समिती महाराष्ट्र राज्य करिता कार्यरत असून या समितीचा उद्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांगांच्या न्याय व हक्कांसाठी लढा देऊन हक्क मिळवून देण्यासाठी या समितीची निर्मिती केली आहे. या समितीच्या वतीने दिनांक 1 मे 2026 रोजी कामगार दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी 8 वाजता दिव्यांग बांधवांचे ढोल बजाव आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी दिव्यांगांच्या समस्या खालील प्रमाणे आहेत
1. दिव्यांगांच्या व्यवसाय करिता शासनाच्या जागेमधून दिव्यांग बांधवनकरीता 200 चौरस फूट जागा मिळावी
2. दिव्यांग बांधवांना घर पट्टी मध्ये 50% सवलत मिळावी.
3. शासकीय नोकरी मध्ये दिव्यांगाचा 5% अनुशेष त्वरीत भरावा व सिंधुदुर्गातील दिव्यांग उमेदवारांना संधी मिळावी.
4. दिव्यांगांची पेन्शन नियमित व वेळेवर मिळण्याकरिता प्रयत्न केले जावे.
5. दिव्यांग बांधवांना इ रिक्षा निकृष्ट दर्जाची दिली असून त्याची चौकशी करावी व दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून द्यावा.
6. जिल्हा परिषद 5% निधीतून दिव्यांगांना दिव्यांग निधी अद्याप वाटप झालेले नाही ते त्वरीत होण्याकरिता प्रयत्न केले जावे.
7. जिल्हा परिषद समितीचे समाजकल्याण अधिकारी पद त्वरीत भरण्यात यावे व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पद त्वरीत भरण्यात यावे यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न केले जावे.
8. दिव्यांगांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिव्यांग भवन व्हावे या व आदी दिव्यांगांच्या मागण्या असून तरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधव,दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या संस्था,संघटना, व सामाजिक कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन दिव्यांग विकास प्रणित हक्क समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

*आंदोलनाचे स्थळ:* जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग.
*वेळ :* सकाळी ८ वाजता

प्रतिक्रिया व्यक्त करा