You are currently viewing काव्यप्रेमी महाराष्ट्र साहित्य समूहाचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम लेख

काव्यप्रेमी महाराष्ट्र साहित्य समूहाचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम लेख

*पाण्याचा जी आर संस्कृती माणसाला युद्धाकडे घेऊन चाललेली आहे काय?*

 

*कळतय पण वळत नाही* अशी स्थिती झालेल्या पाणी प्रश्नाच्या संदर्भाने आपण थोडसं चिंतन करणार आहोत.

भारत देशभर आणि जगभर पाण्याचा प्रश्न आ वासून आपल्यासमोर उभा आहे. निसर्गाचा समतोल बिघडत असताना,अचानक धोधो पाऊस कोसळतो आहे. काळी माती वाहून घेऊन जात आहे,तर काही ठिकाणी अचानकपणे दुष्काळ पडतो आहे. मागच्या 30 वर्षात शुद्ध पाणी घेऊन वाहणाऱ्या नद्या आता ओसाड आणि उजाड झालेल्या आहेत.सोबत गलिच्छ पाणी, अशुद्ध पाणी रसायन वाहून नेतांना दिसत आहेत.

जर उद्याचा पाण्याचा प्रश्न आज आपण गंभीरतेने घेऊ शकलो नाही तर उद्याची पिढी आपणास माफ करणार नाही.

पाणी प्रश्न घेऊन,अशा विषयाकडे आपल्याला थोडंसं वळावे लागेल.पवित्र संस्कृती म्हणून वळवे लागेल.पाणी म्हणून वळवं लागेल.धार्मिक तीर्थक्षेत्र याचं पावित्र्य टिकावं म्हणून वळवं लागेल….

लोकांचा सहभाग घेऊन पाणी प्रश्नाकडे गंभीरतेने पाहून शुद्ध वाहणाऱ्या नद्यांची निर्मिती करणे आवश्यक होणार आहे. भविष्यात येणारा पाणी प्रश्न खूप मोठा गंभीर होणार आहे. जो आजच झाल्याचे दिसते आहे.

आज भारतामध्ये एकही नदी शुद्ध वाहताना दिसत नाही.

सर्व नद्या घाण पाणी वाहून घेऊन जाण्यासाठी निर्माण झाल्या आहेत असाच भास होतो आहे.

1980-90 च्या कार्यकालापर्यंत किमान छोट्या छोट्या नद्या वाहताना दिसत होत्या. झुळझुळ वाहणारे पाणी आम्ही हाताने पीत होतो.कुठलीही बादा होत नव्हती. त्याच नद्या आज रसायन घेऊन वाहताना दिसत आहेत. म्हणजे भारत देशातलं शंभर टक्के पाणी आता अशुद्ध झालेलं आहे.

*त्यातूनच जीआर नावाच्या पाण्याची संकल्पना पुढे आली.* आता पूर्ण भारतभर, वस्ती ग्रामीण आणि शहर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरात जीआर चं पाणी विकत घेऊन प्यायला लागले आहेत.

उद्या शुद्ध पाणी विकतही मिळणार नाही. याची प्रचिती समोर दिसताना आपण पाहत आहोत.

ज्यांच्याकडे समज आहे. उम्मीद आहे. पैशाचं पाठबळ आहे.आणि आपल्या शब्दाला समोरचे लोक मान्यता देत आहेत. त्या प्रत्येक व्यक्ती, राष्ट्र अभिमान पेरणारी विचार देणारी मंडळी, स्वयंसेवी संस्था, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी आजच शुद्ध पाण्यासाठी गावाची निर्मिती करण्याचीं आवश्यक आहे. आणि यासाठी आपल्या सर्वांनी मिळून पाणी या विषयाला न्याय देण्यासाठी काम करावं लागनार आहे.

*गाव तिथे शुद्ध पाणी अभियान*

हे आज आपण सुरू करू शकलो नाही तर पुढच्या दशकानंतरची पिढी पाण्यासाठी युद्ध करेल. रक्त सांडेल पन पाण्याचा एकही घोट मिळणार नाही.

म्हणून पाण्यावरती काम करण्यासाठी लाखो लाखो हात उभे करणे अत्यंत आवश्यक आहे.

शहरातून वाहून जाणारे सांडपाणी त्याचे व्यवस्थापन आजच लोक आणि सरकारने सुरू करणे आवश्यक आहे. प्रत्येक गाव शिवारात पडलेलं पावसाचे पाणी हे गावात मुरविणे संचयन करणे आणि उरलेले पाणी पृथ्वीच्या पोटात साठविण्यासाठी परक्युलेशन करणे याचे सुनियोजन आजच करणे खूप योग्यतेचं ठरणार आहे.

यासाठी सुरू करावं लागेल पडीक जमिनीवरती ट्री प्लांटेशन, सांडपाण्याचं व्यवस्थापन, आणि पाण्याच्या संचयनाचे विविध स्त्रोत.

शेती पाण्याचं व्यवस्थापन. अशा अनेक गोष्टी विचारपूर्वक सुनियोजन करून पाण्याचा थेंब ना थेंब राष्ट्र संपत्ती म्हणून वापरावा लागेल.

 

✒️भूमिपुत्र वाघ, धाराशिव

प्रतिक्रिया व्यक्त करा