*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*त्याचे होऊनी रहावे*
भोगायचे प्रारब्धाला
मन निर्भय करावे
तोच एक ठेवू चित्ती
त्याचे होऊनी रहावे…
संकटांचीअटळता
सुखाचीही बरसात
कर्म करत रहावे
श्रध्दा त्यावर ठेवत…
स्मरणात तोच राहो
घ्यावे त्याचे नाम मुखी
दूर ठेवेल तो दु:ख
सदा ठेवे भक्ता सुखी….
मोह मत्सरास टाळू
बुध्दिदाता सदा स्मरा
कुबुध्दीची ठेच लागे
खडा फेकलेला बरा….
कुणी निंदा कुणी वंद
प्रामाणिक ते वागावे
विश्वासून भार घाला
त्याचे होऊनी रहावे…!!
अरुणा दुद्दलवार..@✍️
