साहेब आत्ता तरी घरातून बाहेर निघा…नितेश राणे यांनी केले ट्विट

साहेब आत्ता तरी घरातून बाहेर निघा…नितेश राणे यांनी केले ट्विट

नितेश राणे यांनी केले ट्विट …

साहेब आत्ता तरी घरातून बाहेर निघा… मुख्यमंत्री साहेब

सावंतवाडी / प्रतिनिधी :-

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वास्तव्य असणाऱ्या मातोश्री बंगल्यावर धमकीचा फोन आल्याचे कळताच नितेश राणे यांनी ट्विटरवर ट्विट केले आहे.

समाजकारण ,अर्थकारण , आणि राजकारणावर मातोश्री बघण्याचं आलेल्या आदेशांचा अनेकदा परिणाम दिसून आला आहे. मात्र ज्या मातोश्री बंगल्यातून आलेल्या आदेशाने संपूर्ण मुंबई बंद व्हायची आत्ता त्याच बंगल्यावर एका अज्ञात फोन द्वारे धमकी दिल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
या घटने नंतर नितेश राणे यांनी स्माईली टाकून एक ट्विट केले आहे.

शेवटी

महाराष्ट्र च्या जनतेची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी थेट दुबई वरून फोन आला….डायरेक्ट दाउद ची धमकी आली..आत्ता तरी घरातून बाहेर निघा मुख्यमंत्री साहेब!!!

अश्याप्रकारे नितेश राणे यांनी ट्विट द्वारे स्मायली टाकून प्रीतिक्रिया दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा