You are currently viewing दोडामार्गमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक; निलेश राणेंचा सत्कार

दोडामार्गमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक; निलेश राणेंचा सत्कार

दोडामार्गमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक; निलेश राणेंचा सत्कार

नगरपंचायत निवडणूक लढविण्याबाबत चर्चा; संघटना बळकटीसाठी मार्गदर्शन

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यात शिवसेना पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच तसेच शिवसैनिक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माजी आमदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
बैठकीत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी संघटनात्मक बांधणी, गावपातळीवरील सक्रियता आणि आगामी निवडणुकांची तयारी याबाबत मते मांडली.
तसेच दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने रणनीती आखण्याबाबतही चर्चा झाली. आगामी काळात संघटनात्मक बळ वाढवून निवडणुकीत प्रभावी कामगिरी करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा